जालना : जायकवाडी योजनेतून जालना शहरासाठी आणण्यात आलेले पाणी अंबडला देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी मामा चौकात काळे झेंडे लावून धरणे दिली. मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रश्नावर तातडीने बैठक घेणार असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलन स्थगित झाले. जायकवाडी योजनेद्वारे अंबड शहराला पाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता. या निर्णयास तीव्र विरोध करून माजी आ. गोरंट्याल व नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांनी सोमवारी विभागीय आयुक्तांना साकडे घातले होते. तसेच आज सकाळपासून धरणे आंदोलन सुरू होते. गोरंट्याल, रत्नपारखे यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दूल हाफिज, महिला शहराध्यक्षा शीतल तनपुरे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, अभयकुमार यादव, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाढेकर, दलित आघाडीचे शहराध्यक्ष धर्मेश निकम, योगेश भगत, रेणुका गौरक्षक, नगरसेविका जागृती यादव, संजय भगत, महावीर ढक्का, रवींद्र अकोलकर, महेंद्र अकोले, शेख माजेद, अरूण मगरे, संजय गायकवाड, बाबूराव जाधव, विष्णू वाघमारे, दाभाडे, जल्लेवार, जगदीश भरतिया, वाजेद पठाण, किशोर गरदास आदींनी धरणे देऊन काळे झेंडे दाखविले. सरकारविरोधी घोषणाबाजीही केली. आंदोलन सुरू असतानाच पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यामार्फत संदेश घेऊन भाजपाचे शहराध्यक्ष वीरेंद्र धोका आंदोलनस्थळी आले.मुख्यमंत्री फडणवीस हे माजी आमदार कैलास गोरंट्याल व नगरपालिकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांना पाचारण करून नागपूर किंवा मुंबई येथे यासंदर्भात बैठक घेणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. त्यानंतर गोरंट्याल यांनी आंदोलनास स्थगिती दिली. या आंदोलनात सत्यनारायण गुल्लापेल्ली, संतोष माधोले, रमेश गौरक्षक, राजस्वामी, साळवे, जाफरभाई, चंद्रसेन निर्मल, वसंत राजे, शेख सलीम, शेख मुश्ताक, बोरडे, शेख जावेद पाशा, अशोक उबाळे, युसूफ, योगेश साळवे, मनोज शर्मा, शिवाजी दाभाडे, अशोक नावकर, रहिम तांबोळी, विनोद गडम, संगीता कांबळे, लिलाबाई डोंगरे, मंदा पवार, सुमनबाई निर्मल, राम मोरे, विलास जगधने, दावीद गायकवाड, विजय सोनवणे, रामकुवर अहिरे, सरूबाई निकाळजे, राधाबाई काकडे, सुमनबाई दाभाडे, वत्सलाबाई कांबळे, सुमनबाई पेरके, शोभा रेसवाल, वंदना राऊत, वंदना दांडगे, बाळू पाटील, कैलास गुरवे, अजय जाटवे आदींचा सहभाग होता. सूत्रसंचालन विनोद यादव यांनी केले. तर डेव्हीड घुमारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)४माजी आ. गोरंट्याल याप्रसंगी म्हणाले की, हा चुकीचा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा. जालना शहरवासियांना पाण्यापासून वंचित करू नये. आपण आमदार असताना सरकारविरुद्ध संघर्षाची भूमिका घेतली. त्यावेळी मंत्रिमंडळात अंबडला पाणी द्यावे, असा कोणताही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चुकीची माहिती देऊन अंबडला पाणी देण्याबाबतचे आदेश काढून घेतले, असा आरोपही गोरंट्याल यांनी केला.
पाणीप्रश्नावर आता मुख्यमंत्री घेणार बैठक
By admin | Updated: December 24, 2014 01:00 IST