शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार सभेसाठी सुकाणू समितीची बैठक

By admin | Updated: July 9, 2017 00:30 IST

नांदेड : कर्जमाफीसंबंधी जाचक अटींच्या शासन निर्णयावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हास्तरीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कर्जमाफीसंबंधी जाचक अटींच्या शासन निर्णयावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हास्तरीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली़ शेतकरी आंदोलनाचा राज्य सरकारने विश्वासघात केल्याचा सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी आरोप केला़ जिल्हास्तरावर घेण्यात येणाऱ्या एल्गार सभेसाठी नियोजन करण्यात आले़ विविध शेतकरी व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक ७ जुलै रोजी शासकीय विश्रामगृहात पार पडली़ अध्यक्षस्थानी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे हे होते. महाराष्ट्राच्या शेतकरी सुकाणू समितीच्या निर्णयानुसार ९ ते २४ जुलै पर्यंत राज्यभर एल्गार सभा जिल्हास्तरावर घेण्याचे ठरले. १८ जुलै रोजी नांदेड येथे राज्य सुकाणू समितीचा दौरा येणार असून त्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. जिल्हास्तरीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. अर्जुन आडे यांची जिल्हा समन्वयक म्हणून एकमताने निवड करण्यात आली. बैठकीत पुढील कार्यक्रमाचे नियोजन ठरले. १८ जुलै रोजी किनवट येथे जाहीर मेळावा घेण्याचे ठरले. तर नांदेड शहरातील मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी ९ जुलै रोजी बैठक होईल. बैठकीस सर्व संघटनांच्या सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वयक कॉ. अर्जुन आडे यांनी केले़ बैठकीस विशेषत्वाने किसान सभेचे कॉ. अर्जुन आडे, शेकाप किसान आघाडीचे भाई दत्ता कुरूडे, भाई राजेश ढवळे, शेतकरी संघटनेचे शिवाजी कराळे, आदिवासी शेतकरी राष्ट्रीय अधिकार मंचचे शंकर सिडाम, म. रा. शेतमजूर युनियनचे कॉ. विनोद गोविंदवार, शेतकरी संघर्ष सभेचे किशोर पवार, एसएफआय विद्यार्थी संघटनेचे राज्य सचिव बालाजी कलेटवाड, जिल्हाध्यक्ष विकास वाठोरे, सीआयटीयूचे कॉ. विजय गाभणे, किसान संघर्ष मोचार्चे शिवाजी गायकवाड, देवस्थान शेतकरी बचाव आंदोलनाचे मनोज कीर्तने, डीवायएफआयचे जनार्दन काळे, भोई संघटनेचे नानासाहेब लकाटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कॉ. विनोद गोविंदवार यांनी केले. कॉ. बालाजी कलेटवाड यांनी आभार मानले.