शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत ‘आरटीई’ प्रवेशाची बैठक इंग्रजी शाळाचालकांनी उधळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:54 IST

‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासंबंधी प्राथमिक शिक्षण विभागाने आयोजित केलेली इंग्रजी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक मंगळवारी महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्या (मेस्टा) पदाधिकाºयांनी उधळून लावली.

ठळक मुद्दे‘मेस्टा’ : २५ टक्के जागांवरील प्रवेशाचा परतावा द्या; संस्थाचालकांचे हातात फलक घेऊन मूक आंदोलन; मुख्याध्यापकही सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासंबंधी प्राथमिक शिक्षण विभागाने आयोजित केलेली इंग्रजी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक मंगळवारी महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्या (मेस्टा) पदाधिकाºयांनी उधळून लावली.प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाºयाविनाच मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास समर्थनगर येथील विवेकानंद महाविद्यालयात विस्तार अधिकाºयांच्या उपस्थितीत सुरू झाली. तेव्हा महाविद्यालयाच्या गेटवर ‘मेस्टा’चे पदाधिकारी प्रल्हाद शिंदे, प्रवीण आव्हाळे, अमित भोसेकर, रत्नाकर फाळके, संजय पाटील, मनीषा जोशी आदींसह शेकडो संस्थाचालकांनी हातात निषेधाचे फलक घेऊन मूक आंदोलन केले. यावेळी इंग्रजी शाळांचे काही मुख्याध्यापकही बैठकीतून उठून ते या आंदोलनात सहभागी झाले.काही अवधीनंंतर बैठक हॉलमध्ये संस्थाचालक प्रल्हाद शिंदे व अन्य काही पदाधिकारी गेले व त्यांनी विस्तार अधिकारी संगीता सावळे यांना मागण्यांसंबंधी बोलण्यास भाग पाडले. मात्र,२५ टक्के जागांवर दिलेल्या प्रवेशाचे शाळांना मागील ६ वर्षांपासून शुल्क परतावा मिळालेला नाही.यासंबंधीचे ‘मेस्टा’चे पदाधिकारी व मुख्याध्यापकांना ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे आजच्या या बैठकीवर सर्वच मुख्याध्यापकांनी बहिष्कार टाकत सभात्याग केला. विशेष म्हणजे, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी आजची ही बैठक बोलावली; मात्र त्यांनीच या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे उपस्थित इंग्रजी शाळांच्या मुख्याध्यापकांनी नाराजी व्यक्त केली.आजच्या या आंदोलनामध्ये सचिन शेलार,भाविक शेलार,भगवान पवार, उदय राजगुरू, उमेश अहिरराव, विलास दहिभाते, सुदाम देवरे, कबीर अहमद, श्रद्धा नायर, झिया शेख, सुवर्णा मुंदडा, अर्चना अहिरराव, अशोक गोरे, राजेश नगरकर, सुरेखा झिरपे, अरविंद जाधव आदींसह इंग्रजी शाळांचे संस्थाचालक व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मागण्यांचा विचारहोणार की नाहीयावेळी ‘मेस्टा’चे प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला की, आम्ही संघटनेच्या माध्यमातून सातत्याने शिक्षणाधिकाºयांकडे थकीत शैक्षणिक शुल्क परताव्यासंबंधी पाठपुरावा केला. अनेक निवेदने दिली, चर्चा केल्या; पण ठोस आश्वासन मिळाले नाही. आजच्या या आंदोलनाची शिक्षणाधिकाºयांना पूर्वकल्पना दिलेली असताना त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यास आमचा विरोध नाही; पण मागील ६ वर्षांच्या शैक्षणिक शुल्क परताव्याबद्दल शिक्षणाधिकारी निष्काळजीपणा दाखवत आहेत. या वृत्तीस आमचा विरोध आहे.