शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ कायद्यासंदर्भात आमदारांची बैठक

By admin | Updated: May 30, 2016 01:13 IST

औरंगाबाद : नव्याने येऊ घातलेल्या महाराष्ट्र नागरी विद्यापीठ कायद्यासंदर्भात नेमलेल्या आमदारांच्या समितीची ३१ मे रोजी मुंबईत बैठक होणार आहे.

औरंगाबाद : नव्याने येऊ घातलेल्या महाराष्ट्र नागरी विद्यापीठ कायद्यासंदर्भात नेमलेल्या आमदारांच्या समितीची ३१ मे रोजी मुंबईत बैठक होणार आहे. प्रस्तावित कायद्यातील काही तरतुदींना आमदारांचा आक्षेप असून, याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. मार्च २०१६ मध्ये झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक मांडण्यात आले. मात्र, अनेक आमदारांनी विधेयकातील तरतुदींना विधान परिषदेत विरोध केला होता. विधान परिषदेत सत्तारूढ भाजप- शिवसेनेचे बहुमत नाही. त्यामुळे या कायद्यातील तरतुदींवर चर्चा करण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या आमदारांची एक समिती नेमण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार या आमदारांची ३१ मे रोजी विधेयकातील तरतुदींसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. मुख्यत: कुलगुरूंना जादा अधिकार देण्यास विरोधी पक्षातील आमदारांचा आक्षेप आहे. त्याशिवाय विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवरील नियुक्त्यांनाही आमदारांचा विरोध आहे. या तरतुदीला शिवसेनेच्या आमदारांचाही विरोध असल्याची माहिती आहे. नियुक्त्यांच्या माध्यमातून विद्यापीठामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींचे बस्तान बसविण्याचा प्रयत्न भाजप करील, असे विरोधी पक्षातील आमदारांना वाटत आहे. त्यामुळे यासंदर्भातील तरतुदींवर चर्चा होणार आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.