शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

‘मातोश्री’ वर मंगळवारी बैठक

By admin | Updated: September 11, 2016 01:24 IST

औरंगाबाद : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना पदावरून नव्हे तर पक्षातूनच हाकलून लावा, अशी मागणी सेनेतील एका गटाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत करून जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली.

औरंगाबाद : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना पदावरून नव्हे तर पक्षातूनच हाकलून लावा, अशी मागणी सेनेतील एका गटाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत करून जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली. सेनेमध्ये आता उघडपणे दोन गट पडले असून, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताच ‘मातोश्री’ने याची तातडीने दखल घेतली. दानवे हटावचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे.जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मागील काही दिवसांमध्ये चक्क पक्ष विकायला काढला असून, त्यांची पदावरून आणि पक्षातूनच हकालपट्टी करा, अशी मागणी आ. संजय शिरसाट, माजी आ. प्रदीप जैस्वाल, मुन्ना त्रिवेदी, अण्णासाहेब माने, माजी महापौर विकास जैन आदींनी दानवे यांच्याविरोधात उघडपणे दंड थोपटले. शिवसेनेत यापूर्वी कधीही आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली नाही. एकमेव दानवे यांच्यासाठी पक्षातील काही नेत्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन करून पत्रकार परिषद घेतली. शनिवारी शहरातील सर्वच स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये दानवे हटावच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. सेनेतील अंतर्गत भडक्याची ठिणगी मुंबईपर्यंत पोहोचली. संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी दूरध्वनीवर स्थानिक हालचालींचा आढावा घेतला. मंगळवारी सकाळी ११ वाजता मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आ. संजय शिरसाट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी बैठकीसंदर्भात आपल्याला अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. मुंबईहून बैठकीचे निमंत्रणही नसल्याचे नमूद केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीत संतुष्ट व असंतुष्ट गटाला पक्षनेते समोरासमोर बसवून गाऱ्हाणे ऐकणार आहेत. त्यानंतर बंद खोलीत दानवे हटावचा निर्णय घेण्यात येणार आहे.