शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या वेळे अभावी आरोग्य सेवा समन्वय समितीची बैठक रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2017 17:23 IST

जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या व्यस्ततेमुळे या समितीची दीड वर्षात एक ही बैठक झाली नाही.

ऑनलाईन लोकमत

बीड/ माजलगांव :  शासनाने दीड वर्षापुर्वी साथीचे व संसर्गजन्य रोगांवर तात्त्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती गठीत केली होती. परंतु; जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या व्यस्ततेमुळे या समितीची दीड वर्षात एक ही बैठक झाली नाही.  

दीड वर्षापुर्वी नागपुर जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लु चा प्रादुर्भाव झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालये, महानगर पालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे शासनाला आढळून आले होते. त्यामुळे साथीच्या व  संसर्गजन्य रोगांवर आळा बसवण्यासाठी  जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती स्थापना करण्याचे आदेश शासनाने काढले होते. पावसाळ्यात साथीच्या रोगा सोबतच स्वाईन फ्ल्यू ने डोके वर काढल्याने या समितीची बैठक होणे अपेक्षित होते. परंतु; ग्राम विकास मंत्री व जिल्हाच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या वेळे अभावी समिती स्थापणे पासून एकही बैठक झालेली नाही. 
 
या समिती मार्फत जिल्ह्यात राज्याच्या व केंद्राच्या आरोग्य विषयक विविध योजना राबल्या जातात, वेगेवेगळ्या विभागात समन्वय घडवून आणणे, संबंधीत विभागाला निर्देश देणे, सार्वजनिक आरोग्य संस्थाचा आढावा घेणे व विविध उपाययोजना
सुचवणे अशी काही महत्वाची कामे या मार्फत होणे अपेक्षित आहे. 
 
तात्काळ बैठक व्हावी 
सध्या जिल्ह्यात साथीच्या रोगाने थैमान घातले असून या  समितीची बैठक न झाल्यामुळे यावर उपाययोजना करणे संबंधीत विभागाच्या अधिका-यांना अवघड चालले आहे. तात्काळ  बैठक घेऊन आरोग्य समस्या सोडवाव्यात.
- डॉ. उध्दव नाईकनवरे, सदस्य, जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती
 
बैठक घेण्याबाबत प्रयत्न सुरु 
समितीची  स्थापना झाल्यापासुन  बैठक घेण्यासाठी आम्ही दोन वेळा पालकमंत्र्यांना पत्र व्यवहार केला होता. मात्र, त्यांच्या वेळे अभावी बैठक होऊ शकली नाही. लवकरच त्यांची वेळ घेऊन बैठकीचे नियोजन करण्यात येईल.  
-नागेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक व सचिव,  जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती