शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बैठक निष्फळ !

By admin | Updated: May 16, 2016 23:31 IST

बीड : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये क्षीरसागरांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडीची मोट बांधण्यासाठी आ. विनायक मेटे यांनी सोमवारी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली.

मेटे मेटाकुटीला : कृउबा निवडणुकीत चौरंगी लढतीची शक्यता बीड : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये क्षीरसागरांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडीची मोट बांधण्यासाठी आ. विनायक मेटे यांनी सोमवारी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली. बैठकीला विविध पक्षाच्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. प्रमुख पदाधिकाऱ्यांअभावी एकमत झाले नाही. त्यामुळे चौरंगी लढतीची शक्यता वाढली आहे.कृउबावर गेली अनेक वर्षे वर्चस्व गाजविणाऱ्या आ. जयदत्त क्षीरसागर यांना शह देण्यासाठी आ. मेटे यांनी ताकद लावली आहे. त्यांनी क्षीरसागर विरोधकांना एकत्रित आणण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर बैठक घेतली. यावेळी माजी आ. जनार्दन तुपे, भाजपचे नवनाथ शिराळे, अ‍ॅड. सर्जेराव तांदळे, शिवसेनेचे सचिन मुळूक, रासपचे राहुल बनगर, रिपाइंचे राजू जोगदंड, माजी मंत्री सुरेश नवले गटाचे आसाराम आमटे यांनी उपस्थिती लावली. शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, प्रभाकर कोलंगडे, अनिल घुमरे, शिवाजी जाधव, सुभाष सपकाळ, सुहास पाटील, राहुल मस्के यांचीही उपस्थिती होती.या बैठकीत केवळ चर्चेचे गुऱ्हाळ रंगले. क्षीरसागरांच्या ताब्यातून कृउबा खेचण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे अशी अपेक्षा आ. मेटे यांनी व्यक्त केली. त्यासाठी हवे तर शिवसंग्रामला कमी जागा सोडा, अशीही तयारी त्यांनी दर्शवली. शिवाय, नेतृत्व कोणीही घ्या, परंतु क्षीरसागरांना झटका द्या, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, ठोस निर्णय झाला नाही.बैठकीनंतर आ. मेटे वगळता इतर पक्षाचे पदाधिकारी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्याकडे गेले. मात्र, त्यांनीही आपला निर्णय अंधातरीच ठेवत १८ मे पर्यंत ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली. भाजपपेक्षा बीड तालुक्यात शिवसेना वरचढ आहे. त्यामुळे शिवसेनेला सोबत घेण्यासाठी मेटे यांची धडपड सुरू आहे. मात्र, सेना-भाजप एकत्रित लढल्यास तिरंगी अन्यथा स्वतंत्र लढल्यास चौरंगी लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे.अशीही शक्यता...पालकमंत्री पंकजा मुंडे व आ. विनायक मेटे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मेटे यांंच्याऐवजी भाजप छुपी युती करून राष्ट्रवादीच्या पाठीमागे ताकद लावू शकतो, अशी शक्यता देखील राजकीय वर्तूळातून व्यक्त होऊ लागली आहे. मेटेंच्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी सबुरीचा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)