शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

झोपेऐवजी अपंगांनी मारली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:40 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाºयांनी अपंगांना विविध योजनांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी ‘प्रहार अपंग क्रांती आंदोलन’च्या कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनासमोर ठिय्या मांडला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाºयांनी अपंगांना विविध योजनांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी ‘प्रहार अपंग क्रांती आंदोलन’च्या कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांना सामोरे जाऊन योजना मार्गी लावण्यासाठी यंदा कुचराई होणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर हे आंदोलन लगेच समाप्त झाले.‘प्रहार अपंग क्रांती आंदोलन’ या अपंगांसाठी काम करणाºया संघटनेने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर ‘झोपा काढो’ आंदोलन आयोजित केले होते. तथापि, या संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे हे सकाळीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अपंगांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांची सुरक्षारक्षकासोबत शाब्दिक चकमक उडाली.तेव्हा झालेल्या धक्काबुक्कीत ते जखमी झाले. त्यामुळे ते जिल्हा परिषदेतील आंदोलनात सहभागी होऊ शकले नाहीत. पूर्वनियोजित या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेत जमलेल्या अपंगांनी मुख्य कार्यकारी अधिकारीमधुकरराजे आर्दड यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला व घोषणाबाजी सुरू केली.अपंगांनी आंदोलन सुरू केले त्यावेळी नेमके मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड कामानिमित्त कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी पुढे आले. अपंगांच्या भावना त्यांनी जाणल्या व यंदा जिल्हा परिषदेमार्फत राबविण्याल्या जाणाºया सर्व योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.यामध्ये प्रामुख्याने समाजकल्याण विभागाने घरकुल योजना, बीजभांडवल योजनांसाठी लाभार्थी अपंगांकडून प्रस्ताव मागविण्यात आल्याची आंदोलनकर्त्यांनामाहिती अधिकाºयांनी दिली. समाजकल्याण विभागामार्फत सव्वाकोटी रुपयांची तरतूद घरकुल योजनेसाठी केली आहे.या योजनेंतर्गत लाभार्थी अपंगांच्या खात्यावर प्रत्येकी सव्वालाख रुपये जमा केले जाणार आहेत.