शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या परिषदेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:19 IST

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २०३५ पर्यंत जगभरातून क्षयरोग हद्दपार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे

ल्ोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २०३५ पर्यंत जगभरातून क्षयरोग हद्दपार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारतात क्षयरोगाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. देशात प्रत्येक मिनिटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो. त्यामुळे २०२५ पर्यंत हे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न आहेत. नव्या औषधोपचारांनी त्यात निश्चित यश येईल, असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेचे कन्सल्टंट डॉ. संजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘महामायक्रोकॉन २०१७’ या भारतीय वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या तीनदिवसीय परिषदेचा रविवारी (दि.१५) समारोप झाला. परिषदेत आयोजित चर्चासत्रात डॉ. संजय सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी व्यासपीठावर इंडियन असोसिएशन आॅफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीचे अध्यक्ष डॉ. किशोर इंगोले, संयोजन अध्यक्ष डॉ. अजित दामले, संयोजन सचिव डॉ. ज्योती इरावणे (बजाज), डॉ. वीरेंद्र काशेट्टी, डॉ. छाया कुमार, डॉ. जयश्री भाकरे यांची उपस्थिती होती.डॉ. सूर्यवंशी यांनी देशातील क्षयरोगाच्या परिस्थितीविषयी मार्गदर्शन केले. प्रमाण कमी करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. डॉ. रंजनी रामचंद्रन यांनी सध्याच्या आणि भविष्यातील क्षयरोग निदानाच्या तंत्राबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. श्रीपाद टाकळीकर यांनी ‘आॅटोमेशन इन मायक्रोबायोलॉजी’ या विषयी मार्गदर्शन केले. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत राज्यभरातील जवळपास २८० डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ़ अनिल गायकवाड, डॉ़ मंगला हरबडे, डॉ़ मुक्ता खापरखुंटीकर, डॉ़ लईक जाफरी, डॉ़ अर्जुन जाधव, डॉ़ अनुजा सामाले आदींनी परिश्रम घेतले.