औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘एमबीए’च्या जागा ६० वरून १२० करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर या विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांना आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स व एनआयपीएम यांच्याशी करार करण्यात आला आहे, अशी माहिती संचालक डॉ. वाल्मीक सरवदे यांनी दिली. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच १०० टक्के प्लेसमेंट मिळाली पाहिजे, यासाठी हिंदुस्थान लिव्हर, बजाज आॅटो, गरवारे उद्योग समूह, स्कोडा, सिमेन्स, ओल्टाज, फोर्बस्, कोलगेट पामोलिव्ह, किर्लोस्कर इंजिनिअरिंग आदी कंपन्यांसोबत लवकरच करार करण्याचा निर्णय व्यवस्थापनशास्त्र (एमबीए) विभागाने घेतला आहे. याशिवाय उच्चशिक्षण व संशोधनात वाव मिळावा यासाठी विभागाने अगोदरच श्रीलंका, स्पेन, टर्की, मलेशिया या देशांसोबत शैक्षणिक करार केलेला आहे. यावर्षी पोर्तुगाल येथील ब्रागा विद्यापीठ व जर्मनी येथील गोयटेक विद्यापीठासोबत करार केलेला आहे.
एमबीएच्या जागा दुपटीने वाढल्या
By admin | Updated: July 21, 2014 00:34 IST