शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीनंतर आता ‘एमबीए’चे रॅकेट झाले उघड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:54 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाºया व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेतील घोटाळ्यांची मालिका या परीक्षेतही कायम राहिली. मागील परीक्षेच्या वेळी अभियांत्रिकीचा झालेला पेपर नगरसेवकाच्या घरी पुन्हा लिहिताना विद्यार्थ्यांना अटक केली होती. यावेळी एमबीएच्या परीक्षेत कार्यरत असणारे रॅकेट उघडकीस आले आहे. या रॅकेटचे धागेदोरे परीक्षा भवनपर्यंत पोहोचत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाºया व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेतील घोटाळ्यांची मालिका या परीक्षेतही कायम राहिली. मागील परीक्षेच्या वेळी अभियांत्रिकीचा झालेला पेपर नगरसेवकाच्या घरी पुन्हा लिहिताना विद्यार्थ्यांना अटक केली होती. यावेळी एमबीएच्या परीक्षेत कार्यरत असणारे रॅकेट उघडकीस आले आहे. या रॅकेटचे धागेदोरे परीक्षा भवनपर्यंत पोहोचत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.विद्यापीठातर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा २६ डिसेंबरपासून घेण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमांच्या परीक्षा ६ केंद्रांवर घेण्यात येत आहेत. यात औरंगाबाद शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालय आणि दुसºया एका महाविद्यालयाचा समावेश आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयात एमबीएची परीक्षा ४५७ विद्यार्थी देत होते. सोमवारी ‘अकाऊंटिंग फॉर मॅनेजर्स’ या विषयाची परीक्षा १० ते १ या वेळेत होती. महाविद्यालयातील हॉल क्रमांक ६ मध्ये परीक्षा देत असलेल्या शे. अजमद कलीम याने अवघ्या सहाव्या मिनिटालाच प्रश्नपत्रिकेचा स्नॅप काढत व्हॉटस्अ‍ॅपच्या ‘फ्यूचर मॅनेजर्स’ ग्रुपवर टाकला. या ग्रुपमध्ये तब्बल १४२ सदस्य आहेत. यातील अवघे तीन सदस्य सोडता सगळे सदस्य ग्रुप अ‍ॅडमिन आहेत. या ग्रुपमधील सदस्य असलेले योगेश भवरे आणि मुज्जू शेख या दोघा जणांना वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या परिसरातच पुस्तकांमधून उत्तरे शोधत असताना महाविद्यालयाच्या कर्मचाºयांनी पकडले. त्यांच्याकडील मोबाईल तपासल्यानंतर प्रश्नपत्रिका आढळून आली. तेव्हा कर्मचारी रवींद्र गवळी, सतीश पवार आणि हनुमंत कोरडे या तिघांनी दोन्ही विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या केबिनमध्ये आणून बसवले.त्यांच्याकडील व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमध्ये प्रश्नपत्रिका टाकलेल्या डीपीवरून परीक्षा हॉलची पाहणी केली असता शेख अजमद कलीम हा सापडला. त्यांच्याकडून या सर्व गोष्टींचा उलगडा झाला.परीक्षा भवनातीलअधिकाºयांचा वरदहस्तविद्यापीठाच्या परीक्षा भवनमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाºयांचा परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करू नये, असा दबाव असल्याचे समोर येत आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातच दोन दिवसांपूर्वी एका प्राध्यापकाने कॉपी करणाºया विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली होती. यानंतर त्या प्राध्यापकालाच परीक्षेच्या कामकाजापासून दूर ठेवण्यात आले. या प्रकारानंतर परीक्षा संचालक डॉ. नेटके यांनी परीक्षा भवनातील सहभागी अधिकाºयांची नावे गोपनीय पद्धतीने देण्याचे आवाहन प्राध्यापकांना केले आहे.अधिष्ठातांचा हस्तक्षेप?वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या परीक्षेत विज्ञान शाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी यांचा मुलगा परीक्षा देत असल्यामुळे त्यांचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोपही एका प्राध्यापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. डॉ. फारुकी यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी परीक्षा केंद्रावर येऊन पेपर रद्द करण्याची घोषणा केली. तसेच दुसरी प्रश्नपत्रिका अर्ध्या तासात उपलब्ध करून पुन्हा परीक्षा घेण्याची तयारी दाखविली. मात्र विद्यार्थ्यांनी लागलीच पेपर घेण्यास विरोध दर्शविला. आम्हाला परीक्षाही नको, पासिंगचे मार्क द्या.. अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. मात्र यातून कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी प्रशासन, कुलगुरू यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेवटी पोलिसांना पाचारण करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून बाहेर काढावे लागले.एमबीएचा पेपर फुटल्यामुळे पेपर रद्द केला आहे. आता हा पेपर पुन्हा नव्याने घेण्यात येईल. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. जो दोषी असेल त्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.- डॉ. दिगंबर नेटके,परीक्षा संचालक