शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘खड्डे’बुजविण्यातच गेला कार्यकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:12 IST

महापौर बापू घडमोडे यांचा दहा महिन्यांचा कार्यकाळ निव्वळ ‘खड्डे’ बुजविण्यात गेला. हे खड्डे रस्त्यांवरील नव्हते, तर त्यांच्या कार्यकाळात येणा-या अनेक अडचणींचे होते

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापौर बापू घडमोडे यांचा दहा महिन्यांचा कार्यकाळ निव्वळ ‘खड्डे’ बुजविण्यात गेला. हे खड्डे रस्त्यांवरील नव्हते, तर त्यांच्या कार्यकाळात येणा-या अनेक अडचणींचे होते. एवढे करूनही महापौरांना १०० कोटींच्या रस्त्यांच्या कामाचे नारळ फोडता आले नाही.२८ आॅक्टोबर रोजी घडमोडे यांचा कार्यकाळ संपत आहे. शनिवारी सुटी असल्याने शुक्रवारी त्यांना आपल्या खुर्चीस अलविदा करावा लागणार आहे. गुरुवारी पत्रकारांसोबत गप्पा मारताना त्यांनी आपल्या भावनांना ‘वाट’मोकळी करून दिली. महापौर होताच अत्यंत कडक शिस्तीचे आयुक्त लाभले. त्यांनी तर एकानंतर एक अधिका-याला घरचा रस्ता दाखविला. त्यामुळे काम करायचे तरी कसे असा प्रश्न पडला होता. महापौर होताच आपण शहर खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. जोपर्यंत शहर खड्डेमुक्त होणार नाही, तोपर्यंत कोणताच सत्कार स्वीकारणार नसल्याचे सांगितले होते. दहा महिने मुख्यमंत्री कार्यालयाचे उंबरठे झिजवून रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी आणला. त्यानंतर महापौरांनी सभागृहात सत्कार स्वीकारला. जेव्हा ही कामे होतील तेव्हा अर्धे तरी शहर खड्डेमुक्त होईल, असा दावाही बापू यांनी केला.अलीकडेच मनपाला दुसरे आयुक्त मिळाले. त्यांच्यासोबत काम करताना अनुभव वाईट आल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. सकाळी झालेला निर्णय दुपारी किंवा सायंकाळी बदलतो, असा आयुक्तांचा स्वभाव आहे, अशाही परिस्थितीत चांगले कामकाज केले. कर्मचाºयांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले. पक्षातील हितचिंतकांनी १० महिन्यांच्या कालखंडात किती खड्डे केले यावर बोलण्याचे बापू यांनी टाळले.