शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

महापौर निवडणूक: अर्ज भरण्यास तीन दिवस मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:02 IST

: महापौर, उपमहापौर निवडणूक २९ आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापौर, उपमहापौर निवडणूक २९ आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. रविवार सुटीचा दिवस असतानाही निवडणूक घेण्यात येणार आहे, हे विशेष. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याकरिता तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून, २४ ते २६ आॅक्टोबरदरम्यान अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे यांचा कार्यकाळ २८ आॅक्टोबर रोजी संपणार आहे. त्यानंतर अडीच वर्षांसाठी महापौरपद हे इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. उपमहापौरपदासाठी आरक्षण नाही. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी २९ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता २४ ते २६ आॅक्टोबर हा तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अर्जाचे वितरण २४ व २५ दोन दिवस होणार आहेत. विशेष सभेसाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने सेनेने ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांना उमेदवारी दिली आहे. उपमहापौरपदासाठी भाजपने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. अडीच वर्षे सेनेवर अंकुश ठेवण्यासाठी भाजपला ज्येष्ठ नगरसेवकाची उपमहापौरपदी वर्णी लावावी लागेल. बापू घडमोडे यांच्या निमित्ताने भाजपला दहा महिने महापौरपद मिळाले. मात्र, या दहा महिन्यांचा सदुपयोग भाजपला करता आला नाही. त्यांचा कार्यकाळ सुखद जाऊ नये यासाठी भाजपमधील अंतर्गत विरोधकांनी महापौरांना कायमच विरोध केला.