शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, उपमहापौर निवडणूक आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:14 IST

ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे २२ वे महापौर होण्याचा मान शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नंदकुमार घोडेले यांना रविवारी मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे २२ वे महापौर होण्याचा मान शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नंदकुमार घोडेले यांना रविवारी मिळणार आहे. आतापर्यंतच्या महापौर निवडणुकांमध्ये महापौर, उपमहापौरांना जेवढे मतदान झाले त्यापेक्षा कितीतरी जास्त मतदान घोडेले यांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, सर्वाधिक मते घेण्याचा विक्रम ते आज प्रस्थापित करतील, असा कयास लावण्यात येत आहे.शिवसेना-भाजप युती दुभंगण्याच्या मार्गावर असताना महापौर निवडणुकीच्या तब्बल २५ दिवस अगोदर शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे युतीचा संसार तुटता तुटता वाचला. भाजप नेत्यांची मनधरणी करून अखेर घोडेले यांनी पाठिंबा मिळविला. मागील आठवड्यात भाजपने जड अंत:करणाने घोडेले यांना पाठिंबा दिला. २५ आॅक्टोबर रोजी भाजपने निष्ठावंतांना डावलून अत्यंत नवख्या उमेदवाराला उपमहापौरपदाची उमेदवारी जाहीर केली. विजय औताडे यांची या पदावर वर्णी लावण्यात आली आहे. यातून घोडेले यांना खूप काही फायदा झाला नाही. उलट अडीच वर्षे भाजपला तोटाच सहन करावा लागणार आहे.रविवारी सकाळी ११ वाजता महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करण्यात येणार आहे. युतीच्या उमेदवारांना ८० पेक्षा अधिक मते पडण्याची शक्यता आहे. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नवलकिशोर राम काम पाहणार आहेत. मागील निवडणुकांप्रमाणेच यंदाही नगरसेवकांना हात उंचावून सभागृहात मतदान करावे लागणार आहे.शिवसेना-भाजप युतीचे सदस्य सहलीवर रवाना झाले आहेत. रविवारी सकाळी ते शहरात दाखल होणार आहेत. सकाळी १०.३० वाजता सर्व युतीचे नगरसेवक एकत्र मनपात दाखल होणार आहेत. सर्वच पक्ष खबरदारीचा उपाय म्हणून व्हीप जारी करणार आहेत.