लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात प्रथमच महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी सकाळी ११ वाजता हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. देशभरातील २५ पेक्षा अधिक महापौर यानिमित्ताने उपस्थित राहणार असून, दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत महापौर बापू घडामोडे यांनी दिली.परिषदेच्या तयारीसाठी पाच समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीला आठ दिवसांपूर्वीच वेगवेगळी कामे वाटून देण्यात आली
महापौर परिषद आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:00 IST