शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
3
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
4
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
5
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
6
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
7
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
8
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
9
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
10
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
11
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
12
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
13
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
14
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
15
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
16
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
17
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

महापौैर, आयुक्त काका... प्राणिसंग्रहालय वाचवा हो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:50 IST

सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांची योग्य काळजी घ्यावी, त्यांना नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून द्यावे. प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द होऊ नये यासाठी ठोस पाऊल उचलण्यात यावे, अशी मागणी आज शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्राण्यांची वेषभूषा धारण करून महापौैर, आयुक्तांकडे केली.

ठळक मुद्देचिमुकल्यांची मागणी : बिष्णोई समाजाचेही निवेदन

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांची योग्य काळजी घ्यावी, त्यांना नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून द्यावे. प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द होऊ नये यासाठी ठोस पाऊल उचलण्यात यावे, अशी मागणी आज शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्राण्यांची वेषभूषा धारण करून महापौैर, आयुक्तांकडे केली. निसर्ग आणि प्राण्यांसाठी काम करणाऱ्या गुरू जांभेश्वर संस्थेनेही आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.‘द इव्हॉलविंग मार्इंडस् प्री-स्कूल’ शाळेतील अत्यंत छोट्या-छोट्या मुलांनी मागील आठवड्यात सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयास भेट दिली. आपल्या प्राणिमित्रांची दयनीय अवस्था पाहून विद्यार्थ्यांच्या मनावर तीव्र आघात झाला. मुक्या प्राण्यांची काळजी महापालिकेने चांगल्या पद्धतीने घ्यावी, प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द होऊ नये म्हणून चिमुकल्यांनी विविध प्राण्यांची वेषभूषा करून थेट महापालिकेत आपल्या शिक्षकांसह दाखल झाले. त्यांनी महापौैर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन प्राण्यांची योग्य देखभाल करावी, त्यांना नैसर्गिक वातावरण निर्माण करून द्यावे, अशी मागणी केली. यावेळी ‘लोकमत’चे उपाध्यक्ष संदीप विश्नोई यांनी विद्यार्थ्यांच्या भावना विषद केल्या. महापौर घोडेले यांनी आश्वासित केले की, प्राणिसंग्रहालयाची परवानगी अजिबात रद्द होणार नाही. बुधवारी सकाळीच मनपाचे शिष्टमंडळ दिल्लीत प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या कारवाईविरोधात अपील दाखल करणार आहे. महापालिकेला निश्चित स्थिगितीही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर महापौर आणि आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना बिष्णोई समाज पर्यावरण संवर्धनासाठी कशा पद्धतीने काम करीत आहे, याची माहिती देण्यात आली. गुरू जांभेश्वर संस्थेतर्फे विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले. यावेळी मन्नत, विराज, आराध्य, आराध्या, तनिष्क, हितांशी, विवान, ऋतुजा, आर्यन, स्वरा, नायसा, मिशिका या चिमुकल्यांची उपस्थिती होती. शाळेच्या प्राचार्या निरूपमा बाफनाही यावेळी उपस्थित होत्या.