शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २१ महापालिकांच्या महापौरांची निवड थेट जनतेतून होणार - देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 06:44 IST

महाराष्ट्रातील क आणि ड वर्ग महापालिकांच्या महापौरांची निवड थेट जनतेतून करण्याचा सरकार विचार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील क आणि ड वर्ग महापालिकांच्या महापौरांची निवड थेट जनतेतून करण्याचा सरकार विचार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले. राज्यात एकूण २५ महापालिका असून, त्यापैकी २१ महापालिका क आणि ड वर्गातील आहेत.सरपंचांच्या निवडणुका थेट जनतेतून करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने अलीकडेच घेतला. त्यानुसार, साडेसात हजार सरपंचांची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होणार आहे. त्या आधी राज्य सरकारने नगरपालिकांतील नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, राज्यातील बहुसंख्य नगराध्यक्ष थेट निवडून आले आहेत. त्यामुळे क आणि ड वर्ग महापालिकांचे महापौरही अप्रत्यक्षपणे न निवडता, त्यांचीही जनतेतून निवड व्हावी, या दृष्टीने राज्य सरकार विचार करीत आहे.देशभरातील महापौरांची परिषद औरंगाबादमध्ये पार पडली. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. त्या वेळी काही महापौरांनीच थेट निवडणुकीची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील काही शहरे अतिशय मोठी आहेत. तिथे महापौरांची थेट निवडणूक घेणे शक्य नाही. मात्र, क आणि ड वर्ग महापालिकांतील महापौरांची निवड जनतेने करण्याबाबत सरकार विचार करीत आहे.क आणि ड वर्गातील महापालिका- औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कूपवाड, अमरावती, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, अहमदनगर, अकोला, जळगाव, नांदेड-वाघाळा, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी आणि पनवेल या २१ महापालिका क व ड वर्ग आहेत.- मुंबई महापालिका अ+ तर नागपूर व पुणे महापालिका अ वर्ग आहेत. ठाणे, पिंपरी-चिंचवड व नाशिक या ब वर्ग महापालिका आहेत.लाल दिव्याची गाडी द्याया परिषदेमध्ये काही महापौरांनी आम्हाला लाल दिव्याच्या गाड्या द्याव्यात, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याला शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांनीही पाठिंबा दिला. त्यांनी महापौरांना आर्थिक अधिकार मिळायला हवेत, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.निवडणुका इतक्यात नाहीतराज्यातील बहुसंख्य महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणितिथे नगरसेवकांमधून महापौरही निवडून गेले आहे. जेव्हा त्या महापालिकांच्या निवडणुका पुन्हा होतील, त्या वेळी महापौरथेट जनतेतून निवडण्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस