शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

घनसावंगीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:37 IST

जालना शहरासह परिसरात रविवारी मध्यम पाऊस झाला. सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी पावसाचा आनंद घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना/परतूर : जालना शहरासह परिसरात रविवारी मध्यम पाऊस झाला. सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी पावसाचा आनंद घेतला. परतूर तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. परतूरमध्ये काही भागात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेती कामांवर परिणाम झाला आहे.शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. उकाडाही जाणवत होता. सकाळी अकरा वाजता पावसाला सुरुवात झाली. अर्धातास हजेरी लावल्यानंतर पाऊस थांबला. दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. भोकरदन नाका, बसस्थानक, मामा चौक, सावरकर चौक, गांधीचमन मस्तगड या भागात वाहन धारकांची गैरसोय झाली. रात्री आठच्या सुमारास पुन्हा पाऊस सुरू झाला. तालुक्यातील निधोना, घाणेवाडी, आंबेडकरवाडी, गुंडेवाडी, जामवाडी, पानशेंद्रा शिवारातही पाऊस झाला. जालना तालुक्यात रविवारी सकाळी ७.७५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली.परतूर तालुक्यात दुपारी आष्टी, सातोना, श्रीष्टी सर्कलमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर परतूर व वाटूर सर्क लमध्ये पावसाने तुरळक हजेरी लावली. आठवडाभरापासून सतत पाऊस पडत असल्याने काही भागात शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे मशागतीचे कामे ठप्प आहेत. परतूर तालुक्यात २० मिमी पावसाची नोंद झाली. अंबड तालुक्यातील जामखेड परिसरात रविवारी ५ ते ७ सुमारे पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाचे पाणी गावातील रस्त्यावरून वाहू लागल्याने रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले होते. मंठपिंपळगाव परिसरात सलग तिसºया दिवशीही पाऊस पडला. अंबड व घनसावंगी तालुक्यात अनुक्रमे ११ व १६.५७ मिलीमिटर पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ३७६.६० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.