शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘माऊली-माऊली, गुरूराज माऊली’

By admin | Updated: November 14, 2016 00:43 IST

बीड कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने कपिलधार येथील मन्मथस्वामी मंदिरात होत असलेल्या यात्रोत्सवात रविवारपासून दिंड्यांचे आगमन सुरू झाले आहे.

राजेश खराडे बीडकार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने कपिलधार येथील मन्मथस्वामी मंदिरात होत असलेल्या यात्रोत्सवात रविवारपासून दिंड्यांचे आगमन सुरू झाले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सिडको, लोहा येथील दिंड्या दाखल होऊन ‘गुरूराज माऊली’चा जयघोष करून कीर्तन, प्रवचन इ. धार्मिक कार्यक्रमांनी कपिलधारच्या निसर्गरम्य वातावरणात भक्तीचा मळा फुलला. सोमवारी काल्याचे कीर्तन होऊन डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिंडीचे आगमन होताच शासकीय महापूजा पार पडणार आहे.कार्तिकी पौर्णिमेदिवशीच मन्मथस्वामी यांना साक्षात्कार झाला असल्याची आख्यायिका आहे. १५३५ साली मन्मथस्वामी यांनी येथे संजीवन समाधी घेतली असून, दरवर्षी शिवनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्याकरिता राज्यातून, तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक या परराज्यांतूनही पायी दिंड्या दाखल होत आहेत. कपिलधारकडे जाणाऱ्या सर्व दिंड्यांचे रविवारी जिल्ह्यात आगमन झाले होते. जागोजागी दिंडीतील भाविकांची सोय करण्यात आली होती. आंध्र प्रदेशातील बिचकुंडा दिंडीत हजारो भाविकांसह तेथील आमदार, खासदार गेल्या अनेक वर्षांपासून पायी सहभागी होतात. सोमवारी कार्तिकी पौर्णिमेच्या सकाळी ११ पर्यंत सर्व दिंड्या दाखल होणार असून, सुमारे ३ लाख भाविकांच्या उपस्थितीत सप्ताहाची सांगता होणार आहे. शिवाय, मांजरसुंबा घाटात रिंगण सोहळा व लिंगायत समाजाचा महामेळावा २६ पटातील शिवाचार्यांच्या उपस्थितीत होणार आहे. रविवारपासून मंदिरात भाविकांच्या भोजनाची माफक दरात सोय करण्यात आली असून, दर्शन रांगांचेही नियोजन करण्यात आले आहे. यंदा जिल्ह्यात मुबलक पाऊस झाल्याने कार्तिकी पौर्णिमेपर्यंत येथील धबधबा वाहत असून, अनुकूल परिस्थितीमुळे भाविकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रम, शासकीय महापूजा व मेळाव्यात समाज जागृती करून यात्रौत्सवाची सांगता होणार आहे.