नांदेड: आपात्कालीन रुग्णवाहिका असलेल्या १०८ मधून सिझरियनसाठी नांदेडला घेवून येणाऱ्या महिलेला रक्तस्त्राव झाल्याने अर्धापूरच्या डॉक्टरांनी रुग्णवाहिकेतच या महिलेची प्रसूती केली़ यावेळी महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला़ त्यामुळे नातेवाईकांसह डॉक्टरांनीही समाधानाचा सुस्कारा सोडला़बाळापूर येथील सारीका रायठक या महिलेला सिझेरियनसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात घेवून येण्यात येत होते़ १०८ या रुग्णवाहिकेद्वारे त्यांना आणण्यात येत होते़ परंतु रुग्णवाहिकेतच त्यांना रक्तस्त्राव अधिक झाल्याने प्रकृती चिंताजनक झाली होती़ त्याचवेळी अर्धापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ़प्रशांत मेरगेवार यांनी डॉ़अर्चना धूताडे यांच्या मदतीने सदरील महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती केली़ यावेळी महिलेला बाळाला जन्म दिला़ अचानक प्रकृती बिघडल्याने चिंताग्रस्त झालेल्या रायठक कुटुुंबियांनी सुटकेचा श्वास सोडला़ दरम्यान, आरोग्य केंद्राचे डॉ़बहात्तरे यांनी बाळाला पुढील उपचारासाठी दाखल केले़ (प्रतिनिधी)
रुग्णवाहिकेत महिलेची प्रसूती
By admin | Updated: August 24, 2014 01:15 IST