शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मास्टरमार्इंड लक्ष्मीच?

By admin | Updated: December 23, 2015 23:59 IST

प्रताप नलावडे, बीड ब्लॅकमेलिंग आणि त्या अनुषंगाने चर्चेत आलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील सेक्स रॅकेटमध्ये लक्ष्मीच मास्टरमार्इंड असल्याची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.

प्रताप नलावडे, बीडब्लॅकमेलिंग आणि त्या अनुषंगाने चर्चेत आलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील सेक्स रॅकेटमध्ये लक्ष्मीच मास्टरमार्इंड असल्याची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. ते दोन मुख्याध्यापक आणि लक्ष्मी यांच्यातील जवळीक, त्या तरुणीला या दोघांच्या संपर्कात आणण्यासाठी तिची मुख्य भूमिका असल्यामुळे पोलिसांच्या संशयाची सूई आता लक्ष्मीच्या दिशेने फिरू लागली आहे.त्या तरुणीने दोघांच्या अश्लिल चाळ्यांची क्लिप तयार करून राहूल नावाच्या साथीदारासह आपल्याला ब्लॅकमेल केल्याची तक्रार मुख्याध्यापक महादेव बजगुडे यांनी केल्यानंतर दररोज या प्रकरणाला वेगवेगळी कलाटणी मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या तरूणीला या दोन मुख्याध्यापकांच्या संपर्कात आणणारी लक्ष्मी ही बजगुडे यांच्याकडे दोन वर्षापूर्वी भाड्याने राहण्यास होती. वर्षभरापूर्वी ती औरंगाबादला नोकरीच्या निमित्ताने गेली होती. बजगुडे यांनी पोलिसांना सुरुवातीला दिलेल्या तक्रारीतही लक्ष्मीनेच त्या तरुणीच्या मोबाईलवरून आपल्याला फोन केला होता आणि तिनेच या तरुणीला तुमच्या महाविद्यालयात प्रवेश द्या, अशी गळ घातल्याची कबुली दिली आहे. तिच्याशी आपले नेहमीच मोबाईवरून बोलणे होत असल्याचेही त्याने म्हटले आहे. त्यामुळे बजगुडे आणि लक्ष्मीमधील जवळीक स्पष्ट होते.केशव भांगे आणि त्या तरुणीमध्ये मोबाईलवरून संभाषण झाल्याचेही तपासात पुढे आले आहे. या दोघांनाही संपर्कात आणण्याची भूमिका लक्ष्मीनेच पार पाडलेली असल्याने लक्ष्मी नेमके कशासाठी असले प्रकार करत होती, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या तरुणीनेच पहिल्यांदा भांगे यांना मोबाईलवरून तुमच्या महाविद्यालयात मला प्रवेश द्या, अशी विनवणी केली होती. तिला भांगे यांचा मोबाईल नंबर देणारी लक्ष्मीच असल्याचे त्या तरूणीनेही कबूल केले आहे.ब्लॅकमेलिंग प्रकरणाची पध्दतशीर योजना आखणाऱ्या राहूल याचीही लक्ष्मीशी ओळख असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. राहूलनेच पोलिसांना लक्ष्मी आणि तिचा प्रियकर फिरायला परराज्यात गेल्याचेही सांगितले असल्याचे समजते. त्यामुळे या दोघांमध्येही जवळीक असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राहूलने आणि त्या मुलीने क्लिप तयार केल्यानंतर बजगुडे याला ३९ कॉल केले असून एका कॉलमध्ये राहूलने ५० लाखाची मागणी करताना, तुम्हाला ५० लाख ही रक्कम जास्त नाही. तुमचा आम्ही सर्व्हे केला असून तुमची आर्थिक परिस्थिती आम्हाला माहिती आहे, असे म्हटले आहे. राहूल आणि बजगुडे या दोघांची साधी ओळखही नसताना त्याला बजगुडेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती बारकाईने कशी मिळाली, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. राहूलला बजगुडेसंदर्भात माहिती लक्ष्मीच देऊ शकते कारण ती त्याच्या घरी दोन वर्षे राहिली होती. त्यामुळे तिला बजगुडेच्या कुटुंबाविषयी चांगली माहिती होती, असे एकाने नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर सांगितले.लक्ष्मीचा शोधल्यानंतरच पोलिसांना या प्रकरणाचे नेमके गौडबंगाल काय आहे, हे समजू शकणार आहे. या प्रकरणात लक्ष्मीचा नेमका ‘रोल’ समजला तर संपूर्ण ब्लॅकमेलिंग प्रकरणावरच प्रकाश पडणार आहे.४बजगुडे याने पोलिसांना दिलेल्या सुरूवातीच्या तक्रारीत क्लिप ते ब्लॅकमेलिंग प्रकरणाची सविस्तर माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने तक्रारीत म्हटल्यानुसार २७ नोव्हेंबरला तो स्वत: आणि आतेभाऊ गोपीनाथ पवार हे दोघे दुपारी ४ वाजता औरंगाबादला गेले. मकबरा परिसरात ते त्या तरुणीसह लक्ष्मीला भेटले. त्यानंतर सर्वांनी एका ढाब्यावर जेवण केले. त्यानंतर ती तरूणी तिच्या बेगमपूर परिसरातील रुमवर गेली. दहा पंधरा मिनिटांनी लक्ष्मीने ‘ती तरुणी रुमवर या असे म्हणते’, असे सांगितले. रुमवर गेल्यावर बंद दरवाज्याआड दहा ते पंधरा मिनिटे घालवल्यानंतर अचानक दरवाजा कोणीतरी ठोठावला आणि त्यानंतर तेथून बजगुडेने भीतीने पळ काढला. ४यानंतर चार दिवसांनी त्या तरुणीने मोबाईवरून बजगुडेशी संपर्क साधला आणि राहूलने आपली अश्लिल क्लिप काढली असून त्याचे काय मॅटर आहे ते क्लोज करा, असा निरोप दिला.