शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

गेवराईत इदगाह मैदानावर होते सामूहिक प्रार्थना

By admin | Updated: July 13, 2014 00:18 IST

गेवराई : शहरात एकूण ३० च्या जवळपास मशिदी आहेत. यामध्ये दर्गा मशीद व जामा मशीद ही सर्वात पुरातन मशीद आहे.

गेवराई : शहरात एकूण ३० च्या जवळपास मशिदी आहेत. यामध्ये दर्गा मशीद व जामा मशीद ही सर्वात पुरातन मशीद आहे. यामुळे शहरातील बहुतांश मुस्लीम बांधव दर्गा मशीद येथे नमाज आदा करण्यासाठी जातात. याशिवाय काही भागातील मुस्लीम बांधव आपापल्या भागातील मशिदमध्ये सामुहिक प्रार्थना करतात असे येथील नागरीक अमन काझी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.रमजानचा महिना सुरू असल्याने तालुक्यातील आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात गजबजत आहेत. याशिवाय गेवराई शहरात विविध फळांचे गाडे, कपड्याची दुकाने, सुका मेवा विक्रीची धूम सुरू आहे. दिवसभर पाणीदेखील न पिता उपवास करत सायंकाळच्या वेळी सर्व मुस्लिम बांधव एकत्र येत उपवास सोडतात. उपवास सोडताना सर्वांना बरोबर घेऊन उपवास सोडला जातो. विशेष म्हणजे काही हिंदू धर्मातील नागरीकदेखील रमजानचा उपवास करतात. तेदेखील सायंकाळी सर्वांच्या बरोबर उपवास सोडत असल्याचे चित्र गेवराई शहरात पहावयास मिळत आहे. दिवसभर पाणीदेखील न पिता उपवास केला जातो. सायंकाळच्या वेळी शहरातील बसस्थानक परिसरात फळांचे गाडे लावण्यात आलेले आहेत. सायंकाळी नमाज पठण केल्यानंतर फळांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामध्ये टरबूज, केळी, डाळिंब, पपई, अंबा, पेंड खजूर खाऊन रोजा सोडला जातो. (वार्ताहर)इन्सानियत, भाईचारा शिकविणारा रमजान महिनामुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा व पवित्र सण रमजान आहे. आज १३ वा रोजा आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा रमजान निमित्ताने गजबजू लागल्या आहेत. अजून १७ रोजे बाकी आहेत. यानिमित्ताने सगळीकडे सर्वधर्म समभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुस्लिम बांधवांबरोबरच हिंदू बांधव देखील रोजा करत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात विविध भागांमध्ये पहावयास मिळत आहे.रंगरंगोटी आणि रोषणाईशहरात एकूण ३० मशीद आहेत. मुस्लिम बांधव एकत्र येऊन अल्लाक डे सुख-शांतीसाठी प्रार्थना करतात. विशेष म्हणजे रोजाच्या महिन्यात केलेली प्रार्थना थेट अल्लाहपर्यंत पोहोचते, अशी भावना आहे़ यामुळे शहरातील मशिदींमध्ये मुस्लिम बांधव एकत्र येत प्रार्थना करतात. रमजानच्या निमित्ताने शहरातील मशीदींना रंगरंगोटी व रोषणाई करण्याचे काम सुरू असल्याचे शनिवारी पहावयास मिळाले. २९ जुलै रोजी ईद असल्याने सर्वत्र खरेदीची लगबग सुरू आहे, असे हसन अख्तर यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.अंबाजोगाईमध्ये ईदच्या तयारीसाठी लगबग !अंबाजोगाई : इस्लाम धर्मात रमजान हा महिना अत्यंत पवित्र समजला जातो. संपूर्ण एक महिना हा सण विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. कडक उपवास व धर्मनिष्ठा या बरोबरच आता राष्ट्रीय एकात्मतेसाठीही धर्मातील अनेकांनी पुढाकार घेतला आहे. अंबाजोगाईत रमजान महिना उत्साहात सुरू असून ईदच्या तयारीसाठी महिला व बांधवांची मोठी लगबग सुरू आहे.अंबाजोगाई शहरात जवळपास ३० मशिद आहेत. रमजानच्या निमित्ताने सर्वच मशिदमध्ये नमाज अदा करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मंगळवारपेठेतील महमंदी मशीद, गवळीपुरा येथील मर्कज मशीद, मंडीबाजारातील गढी मशीद, गुरुवारपेठेतील मदिना मशीद, नुरानी मशीद, सदर बाजारमधील मशीद अशा विविध मशिदींमध्ये दररोज सकाळ व संध्याकाळ नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. रमजान ईदच्या निमित्ताने शहारतील ईदगाह मैदान, मौलवीचा पहाड व चांदमारी या परिसरातील मैदानाची स्वच्छता स्थानिक प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. ईदच्या निमित्ताने कपडा बाजार, भुसार व विविध वस्तूंची दुकाने शहरात थाटली आहेत.ईदनिमित्ताने राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने इफ्तार पार्ट्यांचे आयोजन सुरू आहे. सध्या मुस्लिम बांधवांचे परस्परांकडे दररोजचे इफ्तार मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत. (वार्ताहर)परळी: शहरात रमजानच्या निमित्ताने ठिकठिकाणी सामूहिक इफ्तार कार्यक्रम होत आहेत. यामध्ये हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन रोजा साजरा करत असल्याचे परळी शहरात पहावयास मिळत आहे.परळी शहरात एकूण २३ मशीद आहेत. ईदची नमाज शहरात दोन ठिकाणी पठण केली जाते. यामध्ये पोलिस ठाणे मैदान व मलिकपुरा भागातील ईदगाह मैदानचा समावेश आहे. इफ्तार कार्यक्रम सामूहिकरीत्या आयोजित केले जात असल्याने या कार्यक्रमात सर्व जाती-जमातीचे व धर्माचे लोक एकत्र येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)