शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून घडले हत्याकांड

By admin | Updated: December 11, 2014 00:31 IST

जिंतूर :अनैतिक संबंध ठेऊ नको असे वारंवार सांगूनही मयत महिलेने इतरांसोबत अनैतिक संबंध ठेवल्याने महिला व तिची लहान मुलगी या दोघींची हत्या केल्याची खळबळजनक कबुली आडगाव हत्याकांड प्रकरणातील आरोपीने दिली

जिंतूर : इतर व्यक्तींशी अनैतिक संबंध ठेऊ नको असे वारंवार सांगूनही मयत महिलेने इतरांसोबत अनैतिक संबंध ठेवल्याने महिला व तिची लहान मुलगी या दोघींची हत्या केल्याची खळबळजनक कबुली आडगाव हत्याकांड प्रकरणातील आरोपीने दिली आहे़जिंतूर तालुक्यातील आडगाव येथे ६ डिसेंबरच्या पहाटे रामप्रसाद दाभाडे यांच्या शेतावरील आखाड्यावर नंदाबाई रामप्रसाद दाभाडे (वय ३०), आरती रामप्रसाद दाभाडे (३) या दोघींची हत्या झाली होती़ याप्रकरणी पोलिसांनी शेतात काम करणारा बाळू उर्फ पांडुरंग दाभाडे, फिर्यादी रामप्रसाद दाभाडे याची प्रियसी हेमलता जाधव हिच्यासह शेतातील गडी अडप यांना ताब्यात घेतले होते़ पोलिस अधीक्षक अनंत रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे, पोलिस निरीक्षक के़ पी ओव्हळ, स्थागुशाचे विवेक मुगळीकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आरोपीची वेगवेगळ्या प्रकारे चौकशी केली़ श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले़ शेतात गडी म्हणून काम करणाऱ्या बाळू उर्फ पांडुरंग दाभाडे जो की फिर्यादी रामप्रसाद दाभाडेचा पुतण्या आहे, त्याच्या भोवती संशयाची चके्र फिरली़ पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला़ त्याने गुन्ह्याची कबुली देताना म्हटले आहे की, मंदाबाई आखाड्यावर आल्यानंतर तिच्याबद्दल मला आकर्षण निर्माण झाले़ म्हणूनच मी रामप्रसाद दाभाडे यांच्या शेतावर गडी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. ६ हजार महिन्यांवर काम करीत असताना अनेकवेळा पगाराची अपेक्षा केली नाही़ मला नंदाबाई दाभाडे हिच्याशी संबंध प्रस्थापित करायचे होते़ रामप्रसाद दाभाडे नसल्यानंतर मी तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला़ त्यातूनच आमचे संबंध निर्माण झाले़ नंदाबाई दाभाडे हिला मी वारंवार सांगितले की, नवरा रामप्रसाद दाभाडे व मला सोडून दुसऱ्यांशी संबंध ठेऊ नको, परंतु, नंदाबाईने ऐकले नाही़ काही दिवसांपूर्वी त्या भागातील व्यापाऱ्याशी नंदाबाईचे संबंध चालू असताना पांडुरंगने बघितले होते़ त्यानंतर पांडुरंगने नंदाबाईला खतम करण्याचा विडा उचलला व ६ डिसेंबर रोजी रात्री अडीचच्या सुमारास कुऱ्हाडीचे घाव घालून नंदाबाईची हत्या केली़ तर तीन वर्षांची मुलगी आरती हिचा गळा दाबून खून केल्याची खळबळ जनक कबुली आरोपीने जिंतूर पोलिसांना दिली़ आरोपी पांडुरंग दाभाडे याला १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.