जालना: येथील राहत ग्रुपच्या वतीने मुस्लिम समाजातील २८ जोडप्यांचा विवाह सोहळा रविवारी येथे उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी सुरेश अग्रवाल यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मौलाना नईम कासमी, मौलाना इकबाल सिंकदर, मौलाना शकील, कारी मोहमद अली, मौलाना अब्दुल रहेमान, अब्दुल हफीज, जीशान, अजहर बिल्डर, विनोद रत्नपारखे, याकुब कच्छी, मिर्झा अकिल बेग, आरेफ खान, अकबर खान, इनायतमामू, मोहमद फेरोज सौदागर, सययद करीम, कैलास मेघावाले, नबी हसन, मोहन इंगळे, अभय यादव, शेख जाकेर, श्यामराव अल्हाट आदींची उपस्थिती होती. सय्यद असरार अहमद यांनी कुरानचे पठण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सलिम नवाज हशर जाफराबादी, डॉ. जफर एकबाल, डॉ. अब्दुल मुकतदिर अतीक यांनी केले. लियाकत अली खान यांनी आभार मानले. यावेळी समाजबांधवांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)राहत सोशल ग्रुपच्या वतीने १२ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आजपर्यंत ३०० जोडपी विवाहबद्ध झाल्याचे लियाकत अलिखान यांनी प्रास्तविकात सांगितले. मौलाना नईम कासमी यांनी सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज असल्याचे नमूद करून राहत ग्रुपच्या कार्याचे कौतूक केले.
मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा
By admin | Updated: December 20, 2015 23:46 IST