ब्ाीड : लग्न करताना खोटी जन्मतारीख दाखविली, तसेच नोकरीचे आमिष दाखवून फसविल्याप्रकरणी एकाने पत्नीसह सासू-सासऱ्यांसह पाच जणांवर रविवारी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद केला. ही घटना कामखेडा येथे उघडकीस आली.शेख वाजेद शेख पाशामियाँ (रा. कामखेडा) यांचा गेल्या काही वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील तरुणीशी विवाह झाला होता. दरम्यान, लग्नाच्या वेळी मुलीचे वय कमी दाखविले, तसेच नोकरी लावण्याचे आमिष दाखविण्यात आले. मुलीचा आजारही लपविला. खरा प्रकार समजल्यावर शेख वाजेद यांनी विचारपूस केली तेव्हा उडवाउडवीची उत्तरे दिली. शेख वाजेद यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन आदेशानुसार त्यांची पत्नी शाहीन शेख वाजेद, सासरा सरफराज अशरफखान पठाण, सासू हाफिजाबेगम सरफराज पठाण, मेहुणा सरफराजखान, तहसीन सरफराज पठाण (सर्व रा. हुसेन अमरनगर, बायपास रोड, औरंगाबाद) यांच्या विरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पो.हे.कॉ. यू.टी. जरे करीत आहेत. (प्रतिनिधी)
सासरच्यांनी फसविले; पत्नीसह पाच जणांवर गुन्हा
By admin | Updated: January 3, 2017 00:01 IST