शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मसिआ, आर्किटेक्ट संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:24 IST

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत मसिआ संघाने कॉस्मो फिल्म, तर आर्किटेक्ट संघाने शहर पोलीस ब संघावर मात केली. माजी रणजीपटू अनंत नेरळकर व अतिक नाईकवाडे हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत मसिआ संघाने कॉस्मो फिल्म, तर आर्किटेक्ट संघाने शहर पोलीस ब संघावर मात केली. माजी रणजीपटू अनंत नेरळकर व अतिक नाईकवाडे हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.सकाळच्या सत्रात आर्किटेक्ट संघाविरुद्ध शहर पोलीस ब संघाने प्रथम फलंदाजी करीत २० षटकांत ९ बाद १३७ धावा केल्या. त्यांच्याकडून इम्रान पटेल याने ४० चेंडूंत ४ षटकार व ६ चौकारांसह ६९ व रिझवान अहमद याने १४ धावा केल्या. आर्किटेक्ट संघाकडून सुनील भाले याने ११ धावांत ३, तर संजय पाठे व समीर यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात आर्किटेक्ट संघाने विजयी लक्ष्य १८.१ षटकांत पूर्ण केले. त्यांच्याकडून अनंत नेरळकरने ३० चेंडूंत ७ चौकार, २ षटकारांसह नाबाद ५५, युसूफ शेखने ४ चौकार व एका षटकारासह ४५ व शुभम हरकळने २२ चेंडूंत ४ चौकारांसह ३२ धावा केल्या.दुसºया सामन्यात मसिआ संघाविरुद्ध कॉस्मो फिल्मने १६.४ षटकांत सर्वबाद ११५ धावा केल्या. त्यांच्याकडून महेंद्र ढगे याने ३ षटकार व २ चौकारांस सर्वाधिक ३८ धावा केल्या. प्रीतेश चार्ल्सने २२ व हसन असलम याने २० धावा केल्या. मसिआ संघाकडून मंगेश निटूरकरने १४ धावांत ३ गडी बाद केले. अतिक नाईकवाडे व मधुर पटेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. रोहन राठोड, रोहन मोरे, हितेश पटेल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात मसिआ संघाने विजयी लक्ष्य १६.२ षटकांत ३ गडी गमावून ११७ धावा करीत पूर्ण केले. त्यांच्याकडून राहुल शर्माने ३९ चेंडूंत ५ चौकारांसह सर्वाधिक ३६ धावा केल्या. अतिक नाईकवाडे याने नाबाद २९ व मधुर पटेलने २३ धावा केल्या. कॉस्मो फिल्मकडून प्रीतेश चार्ल्सने १ गडी बाद केला.