शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
5
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
6
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
7
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
8
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
9
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
10
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
11
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
12
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
13
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
14
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
15
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!
16
हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा
17
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
18
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
19
Life Lesson: तुम्हाला अतिविचार करण्याची सवय आहे? मग 'हा' गुरुमंत्र येईल कामी!
20
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?

विवाहित मामाचा भाचीसोबत घरोबा !

By admin | Updated: April 14, 2017 00:51 IST

बीड एका विवाहित मामाने पत्नी विभक्त झाल्यानंतर अल्पवयीन भाचीसह धूम ठोकून मामा- भाचीच्या नात्याला काळिमा फासला.

संजय तिपाले बीडविवाह समारंभात मामाला मानाचे स्थान असते. रेशीमगाठी जुळविण्यापासून ते ‘बिदाई’पर्यंत मामाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. मात्र, येथे एका विवाहित मामाने पत्नी विभक्त झाल्यानंतर अल्पवयीन भाचीसह धूम ठोकून मामा- भाचीच्या नात्याला काळिमा फासला. अहमदनगरमध्ये विवाह उरकून या दोघांनी यवतमाळमध्ये संसार थाटला. तब्बल वर्षभरानंतर या जोडीचा पर्दाफाश करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले. मामाला गजाआड केले असून, भाचीला नातेवाईकांकडे सोपविण्यात आले.झाले असे, बीड शहरातील कॅनॉल रोड परिसरात एक मजूर कुटुंब वास्तव्यास आहे. पत्नी साफसफाईची कामे करते तर पती पुणे येथे बांधकामावर मिस्त्रीकाम करतो. त्यांची मुलगी संगीता (नाव बदलले आहे) नववीच्या वर्गात शिकत होती. तिच्या वडिलांसोबत पुणे येथे तिचा चुलत मामा प्रवीण (नाव बदलले आहे) हा देखील मिस्त्रीकाम करत असे. तो मूळचा (सिंदखेड राजा, जि. बुलडाणा) येथील. त्यामुळे त्याचे बीडमध्ये चुलतबहिणीकडे नेहमी येणे- जाणे असायचे. विवाहित असलेल्या प्रवीणला दोन मुले आहेत; परंतु त्याचे पत्नीशी पटत नव्हते. पत्नीने त्याच्यावर छळाची तक्रार दाखल केलेली आहे. तेव्हापासून ती नांदत नाही. प्रकरण काडीमोडपर्यंत येऊन ठेपले आहे. दरम्यान, प्रवीणने चुलतभाची संगीताला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अल्लड संगीताही त्याच्या गोड बोलण्याला भाळली. मे २०१६ मध्ये बीडमधून संगीताला घेऊन प्रवीणने धूम ठोकली. ते थेट औरंगाबादला पोहोचले. त्यानंतर रेल्वेने अहमदनगर गाठले. तेथे त्यांनी एका मंदिरात जाऊन विवाह उरकला. नंतर पंढरपूर, मनमाड, पुणे येथे त्यांनी काही दिवस काढले. बांधकामावर मजुरी करून संसार सांभाळणारे हे दोघे गेल्या काही दिवसांपासून यवतमाळमध्ये वास्तव्यास होते.इकडे संगीता गायब झाल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला; पण ती कुठेच आढळली नाही. चुलतमामा प्रवीणही बेपत्ता असल्याचे कळाल्यावर संगीताच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रवीणविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद झाला; परंतु औरंगाबाद सोडल्यानंतर प्रवीणने सीमकार्ड बदलले. त्यामुळे ‘लोकेशन’ मिळू शकले नाही. शिवाय सतत शहर बदलून वास्तव्य केल्याने पोलीस हतबल झाले होते. यवतमाळमधील पेठ भागात ते असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक निरीक्षक सलीम पठाण यांनी पथक रवाना केले. संगीताला बालन्यायालयाच्या आदेशान्वये तिच्या आई- वडिलांकडे सोपविले. प्रवीणला गुरुवारी न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.