शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
4
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
5
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
6
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
7
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
8
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
9
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
10
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
11
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
12
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
13
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
14
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
15
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
16
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
17
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
18
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती

विवाहितेचा छळ; पतीस शिक्षा

By admin | Updated: August 9, 2014 00:27 IST

औंढा नागनाथ : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीस दंड ठोठावला.

औंढा नागनाथ : माहेराहून पन्नास हजार रूपये आणण्याची मागणी करीत विवाहितेचा शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीस दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा तसेच ५ हजार रूपये दंड ठोठावला. औंढा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने हा निकाल दिला असून या खटल्यातील इतर सात आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली दराडे येथील रमाबाई (वय २८) हिचा विवाह २००२ मध्ये साळणा येथील गंगाधर शंकर खिल्लारे (वय ३२) याच्याशी झाला. लग्नानंतर नवरा व घरातील इतर सदस्यांनी ६ वर्षे चांगले नांदविले. त्यानंतर नवरा, सासरा, सासू, दीर, चुलत सासरा, चुलत सासू, नणंद यांनी शेतात विहीर खोदण्यासाठी व पाईपलाईन करण्याकरिता माहेराहून ५० हजार रूपये घेऊन ये, म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला, या आशयाची फिर्याद रमाबाई गंगाधर खिल्लारे हिने पोलिसांत दिली. त्यावरून आरोपी गंगाधर शंकर खिल्लारे (नवरा), शंकर चांगोजी खिल्लारे (सासरा), सारजाबाई शंकर खिल्लारे (सासू), सुधाकर शंकर खिल्लारे (दीर), कुंडलिक चांगोजी खिल्लारे (चुलत सासरा) जानकाबाई कुंडलिक खिल्लारे (चुलत सासू), अरूणा पांडुरंग ढगे (नणंद), शिलाबाई मिलिंद मोरे (नणंद सर्व रा.साळणा) यांच्याविरूद्ध कलम ४९८ अ, ३४ भादंविनुसार औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. एन. शेख यांनी गुन्ह्याचा तपास करून सर्व आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला औंढा येथील प्रथमवर्ग न्यायालयात चालला. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर औंढा न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. शेंडगे यांनी ६ आॅगस्ट रोजी या खटल्याचा निकाल दिला. आरोपी गंगाधर शंकर खिल्लारे यास कलम ४९८ अ भादंविनुसार दोषी ग्राह्य धरून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या रकमेपैकी ४ हजार रूपये नुकसान भरपाई म्हणून रमाबाई खिल्लारे या हिला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.महेश आहेर यांनी काम पाहिले. (वार्ताहर)