शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा छळ; १६ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:48 IST

: माहेराहून पैसे घेऊन येण्याच्या मागणीसाठी पत्नीला मारहाण करून छळ करणाºया पतीसह सासरच्या १६ जणांविरोधात वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. विवाहितेच्या पतीने दुसरा विवाह केल्याचेही सदर महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : माहेराहून पैसे घेऊन येण्याच्या मागणीसाठी पत्नीला मारहाण करून छळ करणाºया पतीसह सासरच्या १६ जणांविरोधात वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. विवाहितेच्या पतीने दुसरा विवाह केल्याचेही सदर महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.वसमत येथील याकूब कॉलनी भागातील रहिवाशी महिला नाजमीन शेख रफीक (३५) या महिलेने वसमत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी पती शेख रफीक शेख युनूस (रा.वसमत)सह सासू, दीर, नणंद, आदींसह १६ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. महिलेच्या संमतीशिवाय पतीने दुसरा विवाह करून पहिल्या पत्नीला त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.५ संगणकांची चोरीकळमनुरी : इंदिरानगर येथील जिल्हा परिषद उर्ध्वपैनगंगानगर शाळेत १ सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शाळेचे कुलूप तोडून पाच काँप्युटर लंपास केल्याची घटना घडली.१ सप्टेंबरच्या मध्यरात्री शाळेतील बाहेरच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कार्यालयाचे कुलूप तोडून ठेवलेले पाच संगणक लंपास केले. त्यांची किंमत एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. या संगणकात शाळेत सर्व डाटा असल्याने शाळेची चांगलीच अडचण झाली आहे. ठसे तज्ज्ञ, रासायनिक तज्ज्ञ, श्वान पथकालाही पाचारण केले होते. ठसे टी.के. पाईकराव यांनी घेतले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.महा ई सेवा केंद्र येथे चोरीलोकमत न्यूज नेटवर्कसाखरा : येथील बसस्टॅडजवळ शेषराव मारोती इंगळे यांचे महा ई सेवा केंद्र असून ३१ आॅगस्ट रोजी त्यांच्या दुकानामधून दोन मोबाईल विक्रीला ठेवले होते ते चोरीस गेले व त्यांच्यासोबत कॅमेरा व आधार मशीनची जीपीएस कीट, रिचार्ज व्हाऊचर व नगदी चार हजार रुपये असा एकूण ४७ हजार ९११ रुपयांचे साहित्य कोणीतरी चोरट्याने पळविले. दुकानावरील टीनपत्रे काढून आत प्रवेश करून ही चोरी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक वंदना वीरनत तसेच बीट जमादार इंगोले पाटील यांनी दुकानाचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत.