शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 18:59 IST

सासरच्या छळास कंटाळून शिवणगाव येथे गुरु वारी सुनंदा लक्ष्मण रणमाळे हिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर देवचंद अहेर (रा. रामवाडी, नाशिक) यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकात दाखल केली आहे.

त्र्यंबकेश्वर : सासरच्या छळास कंटाळून शिवणगाव येथे गुरु वारी सुनंदा लक्ष्मण रणमाळे हिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर देवचंद अहेर (रा. रामवाडी, नाशिक) यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकात दाखल केली आहे.फिर्यादीवरून विवाहितेचा पती लक्ष्मण वाळू रणमाळे, सासू ठकूबाई वाळू रणमाळे, दीर मनोहर वाळू रणमाळे व पांडुरंग वाळू रणमाळे यांच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत दिलेल्या फिर्यादीत महिलेचा भाऊ ज्ञानेश्वर देवचंद अहेर याने म्हटले आहे की, सततचा शारीरिक व मानसिक छळ करून वैतागलेल्या बहिणीने घराजवळील विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली.२३ वर्षांपूर्वी माझी बहीण सुनंदा हिचा विवाह शिवणगाव येथील लक्ष्मण वाळू रणमाळे बरोबर झाला. गेल्या २३ वर्षांत त्यांना तीन मुले नामे प्रकाश, नवल व चेतन यापैकी, प्रकाश हा मामा ज्ञानेश्वर यांच्याकडे नाशिक येथे राहतो. तर नवल व चेतन हे आईकडे म्हणजे सुनंदाकडे राहत असत. या फिर्यादीत पुढे असे म्हटले आहे की, सुनंदाकडे पती लक्ष्मण, सासू ठकूबाई, जेठ मनोहर व दीर पांडुरंग हे वारंवार पैशाची मागणी करीत असत. कर्ज द्यावयाचे आहे, खर्चाला पैसे मागणे यासाठी सासू ठकूबाईचा वारंवार तगादा असे. पैसे नाही आणले की, सासू आपल्या मुलाला एकाचे दोन करून मुलाला सांगत असे. त्यावरून पती लक्ष्मण हा सुनंदास नेहमीच मारहाण तसेच मानसिक, शारीरिक छळ करीत असे.याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक लोखंडे आदी करीत असून, अद्याप कोणासही ताब्यात घेण्यात आलेले नाही.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या