शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

भांगसीमाता गडावरून ढकलून विवाहितेचा खून

By admin | Updated: June 18, 2017 00:58 IST

दौलताबाद : भांगसीमाता गडावरुन पडल्याने एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली

लोकमत न्यूज नेटवर्कदौलताबाद : भांगसीमाता गडावरुन पडल्याने एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान, पती व दिरानेच तिला ढकलून देऊन मारल्याची तक्रार मयत विवाहितेच्या वडिलांनी पोलिसात दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी सांगितले की, माळीवाडा येथील शीतल रामनाथ फटांगळे (२२) ही शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पती रामनाथसोबत भांगसीमाता गडावर दर्शनासाठी गेली होती. गडावरुन रामनाथने शीतलचे वडील हरिदास सखाराम बनसोड यांना फोन केला व तुमची मुलगी गडावरुन पडल्याचे सांगितले. यानंतर रामनाथचा भाऊ लक्ष्मणनेही फोन करुन ही माहिती हरिदास यांना दिली. प्रत्यक्षात या भावंडांनीच तिला गडावरुन ढकलून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले.शीतलचे लग्न ३० एप्रिल २०१६ रोजी माळीवाडा येथील रामनाथ दत्तू फटांगळे याच्यासोबत झाले होते. विवाहानंतर सहा महिन्यातच रामनाथ तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता. तू मला आवडत नाही म्हणून रामनाथने शीतलला माहेरी आणून सोडले होते. त्यानंतर शीतलच्या वडिलांनी समजूत काढून मुलीस नांदण्यास पाठविले होते. रामनाथ व त्याचा भाऊ लक्ष्मण यांनीच शीतलला गडावर नेऊन तिचा खून केला, अशी तक्रार हरिदास बनसोडे (रा. सोबलगाव, ता. खुलताबाद) यांनी दौलताबाद पोलीस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी रामनाथ व लक्ष्मण या भावांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, पोलीस उपनिरीक्षक संजय मांटे करीत आहेत. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माळीवाळा येथे पोलीस बंदोबस्तात शीतलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.