शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

किलेअर्क, मोंढा, नारेगावातील अतिक्रमणांवर मार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:06 IST

औरंगाबाद : रस्त्याच्या कामात बाधित होणाऱ्या, ऐतिहासिक वास्तूच्या सुशोभिकरणास अडथळा निर्माण करणार्‍या अतिक्रमणांवर महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाच्या पथकाने ...

औरंगाबाद : रस्त्याच्या कामात बाधित होणाऱ्या, ऐतिहासिक वास्तूच्या सुशोभिकरणास अडथळा निर्माण करणार्‍या अतिक्रमणांवर महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाच्या पथकाने मंगळवारी मार्किंग केले. मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या. सिटीचौक ते किलेअर्क रस्ता, मोंढा परिसरातील जाफर गेट, नारेगाव येथील सुखना नदीपात्रात मार्किंग करण्यात आले. अतिक्रमणधारकांना स्वतःहून आपली बांधकामे काढून घेण्यासाठी पालिकेने वेळ दिला आहे. त्यानंतर मनपा अतिक्रमणांवर कारवाई करणार आहे.

सिटीचौक ते किलेअर्क या ३० मीटर रुंद डीपी रोडवरील अतिक्रमणे लवकरच हटवली जाणार आहेत. अतिक्रमणांमुळे या रस्त्यांच्या कामाची गती मंदावली आहे. प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त-२ रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळी रोहिला गल्ली ते किलेअर्कदरम्यान असलेल्या अतिक्रमणांवर मार्किंग केले. तसेच नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या. तसेच जुना मोंढा येथील जाफरगेट येथे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हाती घेतलेल्या सुशोभिकरणाच्या कामात काही अतिक्रमणे असल्याने तेथेही पाहणी करत पथकाने संबंधितांना नोटिसा देऊन अतिक्रमणे काढून घेण्यास बजावले.

मार्किंग करताना पथकात पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, नगररचनाचे उपअभियंता संजय कोंबडे, शाखा अभियंता कारभारी घुगे, स्मार्ट सिटीच्या स्नेहा बक्षी, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, आर. सुरासे यांची उपस्थिती होती.

या पथकाने नारेगाव येथील सुखना नदी पात्राचीही पाहणी केली. पात्रात सुमारे २० बाय ५० फुटांच्या आकाराचे पत्र्याचे शेड दिसून आले. तेव्हा शेडधारकास अतिक्रमण काढून घेण्याची सक्त ताकीद देण्यात आली. पालिकेने सिटीचौक, जाफरगेट व नारेगाव सुखना नदी परिसरातील अतिक्रमणधारकांना स्वतःहून बेकायदा बांधकामे काढून घेण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिलेली आहे. त्यानंतर पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.