शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीचा दिवस नसतानाही बाजारपेठ गजबजली

By admin | Updated: July 29, 2014 01:12 IST

हिंगोली : आठवडी बाजाराचा दिवस नसतानाही रमजान ईदमुळे सोमवारी हिंगोली शहरातील बाजारपेठ गजबजली होती.

हिंगोली : आठवडी बाजाराचा दिवस नसतानाही रमजान ईदमुळे सोमवारी हिंगोली शहरातील बाजारपेठ गजबजली होती. अगदी सकाळपासून सायंकाळपर्यंत मुस्लिम बांधवांनी केलेल्या खरेदीमुळे लाखोंची उलाढाल झाली. प्रामुख्याने शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या पदार्थांपासून ते अत्तरापर्यंत विविध साहित्याची खरेदी करून ईदची केली.रमजान ईद मुस्लिम बाधवांचा सर्वात महत्त्वाचा सण. रमजानच्या प्रारंभापासून रोजा केला जातो. विविध धार्मिक कार्यांसह जकात, नमाज पठण नित्यनेमाने केले जाते. नोकरी, कामानिमित्त बाहेरगावी गेलेले सदस्य ईदसाठी घरी परततात. मागील चार दिवसांपासून लेकीबाळीपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण घराकडे परतत आहेत. ईदच्या पूर्वसंध्येला हिंगोलीत मोठ्या प्रमाणात साहित्याची खरेदी केली. प्रामुख्याने काजू, बदाम, चारोळी, इलायची, शेवया या शिरखुर्म्याचे पदार्थ विकत घेतले. योगायोगाने गत महिन्यापेक्षा भावात बऱ्यापैकी घट झाल्याने मुस्लिम बांधवांना दिलासा मिळाला. आजघडीला खारीक १४० वरून ८०, पिस्ता २०० वरून १८०, चारोळी १ हजारावरून ७००, काजू ७०० वरून ६००, खसखस ५०० वरून ४०० रुपयांपर्यंत घसरली. गत महिन्यात ७०० रूपये किलो असणाऱ्या बदामाच्या दरात ६० रुपयांची घट पहावयास मिळाली. ग्राहकांची मागणी असलेली फेनी प्रतिवर्षी हैदराबाद येथून व्यापारी मागवतात. यंदाही मोठ्या प्रमाणात मागविलेली फेनी ग्राहकांना ४० रूपयांनी स्वस्त मिळाली. मध्यंतरी एका किलोसाठी १२९ रूपये मोजावे लागत असे विक्रेता शेख बाबा शेख मेहमूद तांबोळी यांनी सांगितले. दुसरीकडे दिवाळीच्या सणाप्रमाणे कपड्याच्या दुकानांवर गर्दी होती. बालकांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने नवीन कपड्याची खरेदी केली. युवकांमध्ये फॅन्सी रेडिमेड तर प्रौढांनी पारंपरिक कपड्यांना पसंती दिली. रंगीबेरंगी नव्या डिझाईन्सच्या साड्या महिलांनी खरेदी केल्या. मुलींसह महिलांनी सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानांवर गर्दी केली होती. सोमवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाही खरेदीचीही तेवढीच लगबग पहायला मिळाली. त्यामुळे हिंगोली शहरात लाखोंची उलाढाल सोमवारी झाल्याचे व्यापारी म्हणाले (प्रतिनिधी)ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज मुस्लिम समाजाच्या प्रत्येक सणात अत्तराला मोठे आहे. सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अत्तराची खरेदी करतात. ईदमुळे अत्तराची मागणी वाढली होती. मुंबई, कनोच, हैैदराबाद येथून आणलेले विविध प्रकारातील अत्तर विक्रेत्यांकडे उपलब्ध होते. प्रामुख्याने गुलाब, मोगरा, जन्नत-उल-फित्र, मजमोहा आदी सुगंधी अत्तरांची खरेदी ग्राहकांनी केली. गरजेनुसार ४० पासून ४०० रुपयांपर्यंतचे विक्री झाल्याचे विक्रेता अब्दुल वहीद यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी चंद्रदर्शनानंतर महिनाभर धरलेला रोजा सोडला जातो. मंगळवारी सकाळी १० वाजता हिंगोलीतील ईदगाह मैदानावर सार्वजनिक नमाज अदा केली जाणार आहे. तत्पूर्वी या मैैदानाची साफसफाई करण्यात आली. नमाजानंतर एकमेकांच्या भेटी घेऊन ऐकतेचा संदेश दिला जाणार आहे. दिवसभर शिरखुर्म्याचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. (प्रतिनिधी)