शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

फळभाज्यांचा बाजार बहरला

By admin | Updated: June 5, 2017 00:32 IST

औरंगाबाद : कर्जमाफी व अन्य मागण्यांसंदर्भात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा रविवारी चौथा दिवस होता. पण आज संपाची प्रखरता कमी झाल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कर्जमाफी व अन्य मागण्यांसंदर्भात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा रविवारी चौथा दिवस होता. पण आज संपाची प्रखरता कमी झाल्याचे दिसून आले. जाधववाडीतील बाजारात मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची आवक झाली. तसेच शहरातील विविध ठिकाणच्या भाजीमंडईतही मुबलक प्रमाणात फळभाज्या विक्रीला आल्या होत्या. एवढेच नव्हे तर रविवारचा आठवडी बाजारही नेहमीप्रमाणे भरला होता. तेथे मात्र पालेभाज्यांची कमतरता काही प्रमाणात जाणवली. शेतकऱ्यांच्या संपाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी काही व्यापाऱ्यांनी शेतकरी प्रतिनिधींना मारहाण केली होती. परिणामी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे आज संपाचा चौथा दिवस; त्यातही रविवार असल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून पहाटेपासूनच जाधववाडीतील फळ-भाजीपाल्याच्या अडत बाजारात बंदोबस्त लावला होता. आसपासच्या ग्रामीण भागातून २० ते ३० हजार गड्ड्या पालेभाज्यांची आवक झाली. नेहमीच्या तुलनेत ७० टक्क्यांनी आवक कमी होती. पण फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. जिल्ह्यातूनच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातूनही फळभाज्या घेऊन गाड्या शहरात दाखल झाल्या. टोमॅटोची सर्वाधिक आवक रविवारी झाल्यामुळे अडत बाजारात सर्वत्र लाल टोमॅटोच दिसून येत होते. अडत व्यापारी इलियास बागवान यांनी सांगितले की, १६० टन टोमॅटोची आवक झाली. काल ५०० ते ६०० रुपये प्रती कॅरेट (२० किलो) विक्री होणारे टोमॅटो आज आवक वाढल्याने २०० ते २५० रुपये विक्री झाले. आग्राहून २०० टन बटाट्यांची आवक झाली. तर ५०० पोते कांदाही बाजारात आला. टोमॅटोची एवढी आवक झाली की, त्यातील सुमारे २० टन माल विक्रीविना शिल्लक राहिला होता. त्यातील खराब झालेला सुमारे ३ टन टोमॅटो अडत्यांनी फेकून दिले. जाधववाडीत शनिवारी शुकशुकाट होता. रविवारी संपूर्ण बाजार विक्रेते, ग्राहकांनी बहरून गेला होता. ३०० पेक्षा अधिक विक्रेते व हजारांच्या जवळपास ग्राहक येथे आले होते. आवक वाढल्याने फळभाज्यांचे भावही किलोमागे १० ते ३० रुपयांपर्यंत कमी झाले. किरकोळ विक्रीत टोमॅटो २० रुपये, वांगे, भेंडी ३० रुपये, गवार ४० रुपये, काकडी २० रुपये, सिमला मिरची ४० रुपये, दुधी भोपळा १५ ते २० रुपये, चवळी ४० रुपये, लिंबू २० रुपये प्रतिकिलो विक्री झाले. आज पालेभाज्या तसेच फुलकोबी, श्रावणघेवडा कमी प्रमाणात आला होता. रविवार असल्याने जाधववाडीत आज ग्राहकही मोठ्या संख्येने पालेभाज्या खरेदीसाठी आले होते. यामुळे दररोज १० वाजेपर्यंत चालणाऱ्या या बाजारात आज दुपारी १ वाजेपर्यंत ग्राहकांची गर्दी होती. भाज्यांच्या हातगाड्या गल्लीबोळांत जाधववाडीत मुबलक प्रमाणात फळभाज्यांची आवक झाल्याने रविवारी सिडको-हडको, जवाहर कॉलनी, मुकुंदवाडी आदी भागातील कॉलन्यांमध्ये हातगाडीवाले भाज्या विकताना दिसून आले. शेतकऱ्यांच्या संपामुळे मागील दोन दिवसांपासून भाज्यांची आवक घटल्याने हातगाडीवाले गायब झाले होते.