शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत ६० हजार क्विंटल माल पडून

By admin | Updated: May 7, 2017 00:09 IST

लातूर : आडते आणि हमालाच्या वादात जिल्हाभरातील तब्बल ६० हजार क्विंटल शेतमाल गेल्या पाच दिवसांपासून जाग्यावर पडून आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत व्यापाऱ्याकडून मिळणारी मजुरी अत्यल्प असून या मजुरीत ५० टक्क्यांनी वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी हमाल, मापाडी, गाडीवान संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेल्या संपाचा पाचवा दिवसही कडकडीत बंदचा गेला़ या आंदोलनात हमाल, मापाडी, गाडीवान, महिला कामगारांसह तीन हजार हमालांनी पाचव्या दिवशीही पोत्याला हात लावला नाही़ या आंदोलनामुळे लातूर बाजार समितीतील आडत्यांची दुकाने मालाच्या पोत्याने खचाखच भरली आहेतच़ शिवाय, बाजार समितीचे रस्ते आणि प्रांगणही मालाच्या पोत्यांनी जाम झाले आहेत़ त्यात अवकाळी पावसाचा इशारा मिळाल्याने तिकडे शेतकरी हवालदिल झाला असून, आडते आणि हमालाच्या वादात जिल्हाभरातील तब्बल ६० हजार क्विंटल शेतमाल गेल्या पाच दिवसांपासून जाग्यावर पडून आहे़ गेल्या पाच दिवसात बाजार समिती आणि सहायक कामगार आयुक्तांनी आडत व्यापारी आणि हमाल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या चार बैठका घेतल्या़ मात्र याबाबत शनिवारी कुठलाही मार्ग निघाला नाही़ त्यामुळे चारही बैठका निष्फळ ठरल्या आहेत़ हमालांच्या संपाचा शनिवारी पाचवा दिवस होता़ परिणामी, या संपामुळे बाजार समितीत ५० ते ६० हजार क्विंटल शेतमाल जाग्यावर पडून आहे़ यातून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे़ तसेच कोट्यवधींची उलाढाला ठप्प आहे़ लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १ हजार ५०० आडत व्यापाऱ्यांची नोंदणीकृत दुकाने आहेत़ त्यापैकी ७५० दुकाने सुरू आहेत़ या आडतीवर हमाला, मापाडी, गाडीवान आणि महिला कामगार असे एकूण तीन हजार हमाल काम करतात़ गेल्या अनेक दिवसांपासून हमालीचे दर वाढून मिळावेत, यासाठी या कामगारांचा संघर्ष सुरू आहे़ प्रत्येक वेळी आश्वासन देवून संप मिटविण्याचा प्रयत्न केला जातो़ मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता संबंधित व्यापाऱ्यांकडून होत नसल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे़ सध्या मिळणारी प्रतिक्विंटल हमाली १० रूपये आहे़ ती १५ रूपये करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी कामगार संघटनेची आहे़ याच मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून हा संप सुरू आहे़ लातूरच्या बाजार समितीत १९०० कामगार हे परवानाधारक आहेत़ या कामगारांसह इतर कामगारांची संख्या एकूण तीन हजारांच्या घरात आहे़ २०११ मध्ये हमालीच्या मजुरीत दरवाढ करण्यात आली होती़ तेव्हापासून अद्याप दरवाढ करण्यात आली नाही़ वाढत्या महागाईबरोबर ही दरवाढ होणे अपेक्षित आहे़ मात्र व्यापाऱ्याकडून दुष्काळाचे कारण सांगत गेल्या तीन वर्षांपासून दरवाढ करण्यात आली नाही़ त्यामुळे कामगारांनी पुन्हा काम बंद आंदोलन केले आहे़ परिणामी बाजार समितीतील व्यवहार ठप्प आहेत़