शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

मारहाणीतील जखमीचा मृत्यू

By admin | Updated: May 25, 2015 00:25 IST

शिराढोण : नोकरीचे राहिलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरून एका वृध्दाच्या डोक्यात काठीने वार करून जबर जखमी केल्याची घटना शिराढोण येथे ४ मे रोजी घडली होती.

शिराढोण : नोकरीचे राहिलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरून एका वृध्दाच्या डोक्यात काठीने वार करून जबर जखमी केल्याची घटना शिराढोण येथे ४ मे रोजी घडली होती. दरम्यान, यातील गंभीर जखमी वृध्दाचा २३ मे रोजी उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला असून, याप्रकरणी एकाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिराढोण येथील गणप्या ऊर्फ गणपत रामभाऊ होनमाने (वय ३५) हा दगडू यशवंत देवकते (वय ७७) यांच्याकडे शेतात सालगडी म्हणून कामास होता. देवकते यांनी होनमाने यास ठरलेल्या रकमेपेक्षा जादा पैसे उचल म्हणून दिले होते. कालांतराने देवकते यांनी आगाऊ रकमेची मागणी होनमाने याच्याकडे केली होती. याचाच राग मनात धरून गणपत होनमाने याने ४ मे रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास देवकते हे त्यांच्या शेतातील गोठ्यात झोपले असताना तेथे जावून त्यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हातावर, पायावर तसेच डोक्यात काठीने वार झाल्यामुळे देवकते हे गंभीर जखमी झाले. यानंतर होनमाने याने घटनास्थळावरून पोबारा केला. दरम्यान, देवकते यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती समजताच त्यांनी तात्काळ दगडू देवकते यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वीस दिवस देवकते हे मृत्यूशी झुंज देत होते. अखेर २३ मे रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत दगडू देवकते यांचा मुलगा कल्याण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणप्या ऊर्फ गणपत रामभाऊ होनमाने याच्याविरुध्द रविवारी शिराढोण पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अवये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)दगडू देवकते यांच्या खून प्रकरणी रविवारी पहाटेच्या सुमारास शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवित आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. यावेळी गणपत होनमाने हा येडशी येथे राकेश माकोडे यांच्या शेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी तेथे छापा टाकून तात्काळ त्यास जेरबंद केले. पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्यासह पोना सुधीर तुगावकर, संजय नायकल, राजेंद्र स्वामी यांच्या पथकाने ही कारवाई केली.