शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या हक्काचे विदर्भात जायला नको

By admin | Updated: October 5, 2016 01:17 IST

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या संस्था विदर्भामध्ये पळविण्याचे काम सुरूअसून, मराठवाड्याच्या हक्काचे या प्रदेशातच राहिले पाहिजे,

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या संस्था विदर्भामध्ये पळविण्याचे काम सुरूअसून, मराठवाड्याच्या हक्काचे या प्रदेशातच राहिले पाहिजे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या चार-पाच दिवसांतील पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडला असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे ते म्हणाले. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सकाळी फडणवीस यांची भेट घेऊन मराठवाड्यातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आयआयएम, विधि विद्यापीठ आणि स्कूल आॅफ प्लॅनिंग आणि आर्किटेक्क या संस्था विदर्भात गेल्या आहेत. सध्या अनेक योजना विदर्भात पळविण्याचे काम सुरूआहे. मराठवाड्यात परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने एकरी मदत जाहीर केली पाहिजे. फुटलेले पाझर तलाव दुरुस्तीसाठी मदत केली पाहिजे. विदर्भात डबघाईस आलेल्या काही बँकांना ज्याप्रमाणे केंद्र सरकारची मदत राज्य सरकारने मिळवून दिली त्याच पद्धतीने मराठवाड्यातील डबघाईस आलेल्या जिल्हा बँकांनाही मदत मिळावी. मराठवाड्यात रेशीम उद्योग भरभराटीस येत असून, त्याला मदत करण्याची तसेच मराठवाड्यात टेक्स्टाईल पार्क उभे करण्यासंदर्भात आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ बैठकीआधी राज्य सरकारने मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र, ती सरकारने साफ धुडकावून लावली. एवढेच नाही तर आपण स्वत: दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यातील प्रश्नांसंदर्भात भेट मागूनही ती टाळली जात होती. शेवटी ती देण्यात आली, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला आ. राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ. अमरसिंह पंडित, आ. विक्रम काळे, आ. विजय भांबळे, आ. रामराव वडकुते उपस्थित होते. ४भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना समाजासमोर मार्गदर्शन करू देण्यावरून सध्या मोठा वाद आहे. यासंदर्भात मुंडे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. मी गडाचा केवळ एक भक्त आहे, असे ते म्हणाले. बीड जिल्ह्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला तर नक्की सहभागी होईन, असे ते म्हणाले.