संतोष अन्नदाते, तांदूळजाभारतीय संस्कृताचा इतिहास फार प्राचीन व ऐतिहासिक असून, शासनाच्या उदासिन धोरणांमुळे अनेक गावागावातील एैतिहासिक ठेवा नष्ठ होण्याची भिती निर्माण तर झालीच आहे; परंतू यापैकीच प्रमुख व इ़स़ १७६० साली उदगीरच्या लढाईत निजामांचा पराभव होऊन निजाम व मराठे यांच्यातील तहनामा ज्या गढीत झाला तहनामान्यातील करारानुसार निजामांनी मराठ्यांना मराठवाडी भाषिकांचा ‘वाडा’ म्हणून तसेच तुंगभद्रा नदी पर्यंतचा प्रदेश दिला़ याचपैकी याचे नामकरण ‘मराठवाडा’ असे करण्याचे ठिकाण म्हणजे सुमारे अडीचशे वर्षापासून त्या इतिहासाची साक्ष देत असलेली तांदूळज्याच्या सरदार नाईक बावणे यांची गढी आज ढासळू लागली आहे़ सुमारे अडीचशे वर्षापूर्वी ‘मराठवाडा’ या प्रांताला ‘मराठवाडा’ हे नाव देण्याचा ‘ऐतिहासिक निर्णय’ ज्या गढीमध्ये झाला़ त्या लातूर तालुक्यातील तांदूळजा येथील ‘सरदार नाईक बावणे’ यांच्या गर्दीचा विसर पर्यटन मंत्रालयाने पडला आहे़ मराडवाड्याची जन्मभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गडीच्या विकासासाठी ऐतिहासिक स्थळ विकास योजनेअंतर्गत साधा उल्लेखही दिसून येत नाही़ निजामाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायाने त्याकाळी सरदार नावाची उपाधी देवून कर्तव्यदक्ष मावळे तयार केले़ या सरदारांना विशिष्ट अशा पाच-पन्नास गावाची जहागीरी देवून टाकली व अशा प्रकारे तांदूळजा येथील नाईक बावणे हे त्यावेळचे सरदार होते़ त्याप्रमाणे या सरदारांसाठी व त्याभोवतालच्या प्रदेश संरक्षणासाठी त्यांनी बुरुजवजा मोठमोठ्या किल्ल्याप्रमाणे गढीची निर्मिती झाली़ गढीचे बांधकाम गनिमीकावा पद्धतीने केले गेले़ त्यामुळे शत्रुपासून आले संरक्षण व्हावे तसेच शत्रु आणि त्यांचे मानसे आढळून येताच तोफेचा गोळा शत्रुला लागावा अशा पद्धतीने निर्मिती करण्यात आली़ मराठवाड्याची जन्मभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गढीने अनेक घडामोडी पाहिल्या आहेत़ १९४८ मध्ये तांदुळजा, सारसा, देवळा येथील गावाच्या लोकांवर रजाकाराने जेव्हा अत्याचार सुरु केले तेव्हा तांदुळजाच्या सरदार जगजीवन उर्फ युवराज नाईक बावणे, बाबुराव बंडेराव शिंदे आदी मंडळींनी रजाकाराला सळो की पळो करुन सोडले़ बन्सीलाल मारवाडी यांच्या मुलाची हत्या करुन सोने-नाणे घेवून जाणाऱ्या ४० रजाकारी पठाणांना मांजरा नदीच्या पुरात गराडा घालून जलसमाधी दिली़ तसेच आज तांदुळजा येथे असलेल्या सामाजिक वनिकरणातही काही रजाकाराला ठार करण्यात आले़
मराठवाड्याच्या जन्माचा साक्षीदार ढासळतोय्
By admin | Updated: September 17, 2014 01:13 IST