शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील धरणांची संख्या अचानक वाढली !

By admin | Updated: September 6, 2016 01:06 IST

औरंगाबाद : रखडलेला एकेक सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी वर्षानुवर्षे लागत असताना जलसंपदा खात्याच्या दप्तरी मात्र मराठवाड्यातील धरणांची संख्या अचानक लक्षणीयरीत्या वाढली आहे.

औरंगाबाद : रखडलेला एकेक सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी वर्षानुवर्षे लागत असताना जलसंपदा खात्याच्या दप्तरी मात्र मराठवाड्यातील धरणांची संख्या अचानक लक्षणीयरीत्या वाढली आहे. जलसंपदा खात्याच्या वेबसाईटवरील दैनंदिन अहवालात ही किमया साधली गेली आहे. दैनंदिन अहवालात कालपर्यंत मराठवाड्यात ८४३ सिंचन प्रकल्प होते; परंतु रविवारी ही संख्या वाढून ९५९ इतकी दर्शविण्यात आली आहे. मराठवाड्यात जायकवाडीसह तब्बल ४४ मोठे प्रकल्प असल्याचेही यात म्हटले आहे. पावसाळ्यात जलसंपदा खात्याच्या वेबसाईटवर राज्यभरातील धरणे आणि त्यातील उपयुक्त साठा या विषयीचा दैनंदिन अहवाल टाकण्यात येतो. त्यात विभागवार प्रत्येक प्रकल्पाची माहिती असते. मराठवाड्यात जलसंपदा खात्याचे एकूण ८४३ सिंचन प्रकल्प आहेत. यामध्ये जायकवाडी धरणासह अकरा मोठे, ७५ मध्यम, ७२९ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. शिवाय गोदावरी आणि मांजरा नद्यांवर २८ उच्च पातळी बंधारेही आहेत. जलसंपदाच्या दैनंदिन अहवालातही आतापर्यंत ही संख्या एवढीच दाखविण्यात येत होती. मात्र दोन दिवसांपासून ही संख्या अचानक बदलली आहे. मराठवाड्यात आता ८४३ नव्हे तर तब्बल ९५९ सिंचन प्रकल्प असल्याचे दर्शविले जात आहे. विभागात जायकवाडीसह ११ मोठे प्रकल्प आहेत; परंतु या वेबसाईटवर आता मराठवाड्यात ४४ मोठे प्रकल्प असल्याचे दाखविण्यात येत आहे. लघु प्रकल्पांची संख्याही पूर्वीच्या तुलनेत १०७ ने वाढली आहे. आता विभागात ७२९ नाही तर ८३६ लघु प्रकल्प झाले आहेत. तसेच मध्यम प्रकल्पांची संख्याही ७५ वरून ७९ झाली आहे. मराठवाड्यात मागील काही वर्षांपासून ७२ सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. निधीअभावी हे प्रकल्प रखडले आहेत. एकेक प्रकल्प पूर्ण होण्यासाठी वर्षानुवर्षे लागत आहेत, असे असतानाच जलसंपदाच्या दप्तरी अचानक एवढे प्रकल्प वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.मुख्य अभियंता म्हणाले...अचानक वाढलेल्या या सिंचन प्रकल्पांविषयी औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा)चे मुख्य अभियंता अरुण कांबळे यांच्याकडे विचारणा केली. त्यावर त्यांनी हा प्रकार चुकून घडला असल्याची शक्यता व्यक्त केली. कदाचित अहवालात काही प्रकल्पांची माहिती दोन वेळा नोंदली गेली असावी. तरीही लगेचच त्याची माहिती घेऊन दुरुस्ती केली जाईल, असेही ते म्हणाले.