शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही मराठवाड्याच्या घशाला कोरड

By admin | Updated: August 8, 2014 01:23 IST

औरंगाबाद : निम्मा पावसाळा संपला तरी मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. उलट दिवसेंदिवस विभागात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे.

औरंगाबाद : निम्मा पावसाळा संपला तरी मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. उलट दिवसेंदिवस विभागात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. सद्य:स्थितीत विभागातील ९२६ गावांना ७२३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच ११४४ गावांची तहान त्या-त्या परिसरातील विहिरी अधिग्रहित करून भागविण्यात येत आहे.संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे यंदा मराठवाड्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. रिमझिम पडणाऱ्या पावसावर पिके तग धरून आहेत. मात्र, भूजल पातळी खालावल्याने, तसेच सर्व प्रकल्प कोरडे पडल्यामुळे विभागातील पाणीटंचाई कायम आहे. उलट टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. मराठवाड्यात मागील आठवड्यापर्यंत ९२० गावांना ७१९ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. या आठवड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढल्यामुळे टँकरची संख्याही ४ ने वाढली आहे. सध्या विभागात ९२६ गावांना ७२३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईची तीव्रता औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांत सर्वाधिक आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ३२२ टँकर सुरू आहेत. तर बीड जिल्ह्यातील टँकरची संख्याही २३४ वर पोहोचली आहे. परभणी जिल्ह्यात मात्र, सध्या एकही टँकर सुरू नाही. तसेच हिंगोली जिल्ह्यात अवघे २ टँकर सुरू आहेत.३९ तालुक्यांमध्ये तीव्र टंचाईसर्वच जिल्ह्यांत पाणीटंचाई जाणवत असली तरी काही तालुक्यांमध्ये त्याची तीव्रता अधिक आहे. मराठवाड्यातील ७६ पैकी ३९ तालुक्यांमध्ये भीषण स्वरूपाची पाणीटंचाई जाणवत आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ८, जालना जिल्ह्यातील ५, हिंगोली जिल्ह्यातील २, नांदेड जिल्ह्यातील ६, बीड जिल्ह्यातील ८, लातूर ४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ तालुक्यांना टंचाईच्या झळा बसत आहेत. टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी ठिकठिकाणी विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. मराठवाड्यात १४८१ गावांमध्ये एकूण २०३३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.४बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४९५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात ४४८, नांदेड जिल्ह्यात ३९६, औरंगाबाद जिल्ह्यात ३४१, जालना जिल्ह्यात १३०, लातूर जिल्ह्यात १५७, हिंगोली जिल्ह्यात ५२ आणि परभणी जिल्ह्यात १४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.