शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

मॅरेथॉन सरावाला आलेल्या चिमुकलीला टिप्परने उडविले !

By admin | Updated: January 20, 2017 23:54 IST

लातूर : मॅरेथॉन स्पर्धेसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या मुलीला भरधाव टिप्परने चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी डली.

लातूर : शहरात होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या अकरा वर्षीय शाळकरी मुलीला भरधाव टिप्परने चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता घडली. या अपघातामध्ये मुलगी ठार झाली. पोलिसांनी टिप्पर चालकास अटक केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर शहर वाहतूक व्यवस्थेची चिरफाड करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या. दिवसभर सोशल मीडियावरून वाहतूक शाखेच्या व्यवस्थेवर टीकेची झोड होती.लातूर शहरातील हत्ते नगरातील शाळकरी मुलगी प्रचिती विपीन कोचेटा (१३) ही शहरात एका संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी धावण्याचा सराव करीत होती. नेहमीप्रमाणे प्रचिती क्रीडा संकुलाच्या दिशेने धावत निघाली होती. शिवाजी चौकाकडून भरधाव वेगात आलेल्या (एम. एच. ३१ ए. पी. ११०२) या टिप्परच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील टायरखाली सापडल्याने ती जागीच ठार झाली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी टिप्पर चालक नन्नू महमंद भांगे (४० रा. अंदोरा ता. औसा) याला अटक केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आईसमोरच झाला अपघात... मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रचिती दररोज पहाटे नियमित धावण्याचा सराव करीत होती. सोबतीला आईही होती. हत्तेनगर ते क्रीडा संकुल या मार्गावर ती दररोज हा सराव करीत होती. आई सोबत असायची. अपघाताच्या वेळी आई तिच्या पाठीमागे स्कुटी चालवत लेकीचा सराव पाहत होती. शिवाजी चौक ते क्रीडा संकुल या मार्गावर पाठीमागून आलेल्या भरधाव टिप्परने आपल्या डोळ्यांदेखत चिमुकलीला चिरडले. या भीषण अपघातानंतर मुलीला आईने रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला.