शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाचा एल्गार

By admin | Updated: October 18, 2016 00:36 IST

सिल्लोड :सोमवारी मराठा समाजाची अभूतपूर्व एकजूट बघायला मिळाली.

सिल्लोड : कोपर्डी घटनेचा निषेध, आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल व इतर विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने सिल्लोड शहरात सोमवारी मराठा समाजाची अभूतपूर्व एकजूट बघायला मिळाली. शिस्त व संयमाचे अनोखे दर्शन घडविणाऱ्या या तालुकास्तरीय मोर्चात लाखो समाजबांधवांनी सहभाग नोंदवला. तालुक्याच्या इतिहासात हा मोर्चा सर्वात मोठा ठरला.सिल्लोड येथील संभाजी चौकात सकाळी ११ वाजता सर्व मराठा बांधव जमा झाले. ११.४५ वाजता तेथून शिस्तबद्ध पद्धतीने मूक मोर्चा काढण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा भगतसिंग चौकातून आंबेडकर चौकात आल्यानंतर तेथे त्याचे सभेत रूपांतर झाले. शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या पाठीमागील परिसरात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. तालुक्यातून आलेले विविध पदाधिकारी जनतेत बसले होते. शिवकन्यांनी मंचाचा ताबा घेतला होता. मंचावर उपस्थित शिवकन्यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार संतोष गोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव मोहिते यांना दिले.खुलताबादेतही एकजूटखुलताबाद : खुलताबाद तालुक्याच्या इतिहासात प्रथमच सकल मराठा समाज मोठ्या संख्येने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला. सोमवारी संपूर्ण खुलताबाद शहर विराट मूक मोर्चामुळे भगवेमय झाले होते. तालुकाभरातून हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, युवक, युवती मोर्चात सहभागी झाले होते.दुपारी १२.०५ वाजता भद्रा मारुती मंदिरापासून क्रांती मूक मोर्चाला प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजेपासूनच भद्रा मारुती मंदिर परिसरात समाजबांधवांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. मोर्चाचे संचालन करण्यासाठी ११०० स्वयंसेवक नेमण्यात आले होते. सिल्लोडच्या मोर्चासारखीच वेशभूषा येथेही दिसली. मोर्चावर देखरेख ठेवण्यासाठी दोन ड्रोन कॅ मेरे लावण्यात आले होते.मोर्चाच्या सुरुवातीला बैलगाडीचा सुंदर रथ सजवण्यात आला होता व या रथात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती ठेवण्यात आली होती. या रथाच्या पाठीमागे तीन घोडेस्वार छत्रपतींच्या वेशात होते. यानंतर मोर्चेकरी शांतपणे शिस्त, संयमाने लहानी आळी, मोठी आळी, जुने पोलीस ठाणे, बाजार गल्ली, फर्श मोहल्ला, वडाची आळी, जुने बसस्थानक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयासमोर आले. या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने सात मुलींच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अरुण जऱ्हाड यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर परत भद्रा मारुती मंदिरासमोरील प्रांगणात मोर्चा येऊन सभेत रूपांतर झाले.