शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बीडमध्ये मराठा क्रांतीचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 11:18 IST

हातात भगवे झेंडे.. डोक्याला ‘एक मराठा, लाख मराठा’ असे लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे रुमाल आणि ‘जय जिजाऊ, जय शिवराय’चा जयघोष यामुळे शहर दणाणून गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : हातात भगवे झेंडे.. डोक्याला ‘एक मराठा, लाख मराठा’ असे लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे रुमाल आणि ‘जय जिजाऊ, जय शिवराय’चा जयघोष यामुळे शहर दणाणून गेले. निमित्त होते ९ आॅगस्ट रोजी मुंबईत होणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीपर दुचाकी रॅलीचे. तोच उत्साह आणि तीच शिस्त पुन्हा एकदा बीडकरांना अनुभवयास मिळाली. हजारो समाजबांधवांनी या रॅलीत सहभाग नोंदवून ‘चलो मुंबई’ असे आवाहन केले. महिला, युवतींचीही या रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थिती होती.अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी राज्यभर सकल मराठा समाजाच्यावतीने मुक मोर्चे काढण्यात आले. बीडमध्येही मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये लाखो समाजबांधवांनी सहभाग नोंदवून हा मोर्चा जिल्ह्यातील ऐतिहासिक बनविला होता. त्यावेळेसच्या मोर्चात जी शिस्त आणि उत्साह होता, तोच शनिवारी निघालेल्या दुचाकी रॅलीतही पहावयास मिळाला.दरम्यान, ९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चा संदर्भात जनजागृती व नियोजनासाठी गावागावात बैठका घेतल्या जात आहेत. तसेच दुचाकी रॅली काढून मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे.लक्षवेधी वेशभूषारॅलीसमोर असलेल्या जीपमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होता. बाजूलाच लहान मुलासह युवतींनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. हेच रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा