शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मुख्यमंत्र्यांना क्रांतीचौकात विचारणा जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 17:48 IST

मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारच धोरण काय, यासाठी जाब विचारण्यासाठी मराठा क्रांती मोर्चोचे समन्वयक ४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना क्रांतीचौकात भेटणार आहेत, अशी माहिती समन्वयकांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमराठा समाजाला आश्वासन देऊन शासन झुलवत ठेवत आहे, अशी भावना समाजाची झाली आहे.या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक गुरूवारी सिडकोतील एका मंगल कार्यालयात पार पडली.

औरंगाबाद:   मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारच धोरण काय, यासाठी जाब विचारण्यासाठी मराठा क्रांती मोर्चोचे समन्वयक ४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना क्रांतीचौकात भेटणार आहेत, अशी माहिती समन्वयकांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

समन्वयक म्हणाले की, कोपर्डीतील पीडितेला अद्याप न्याय द्या, मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण द्या, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी करावी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा आदी मागण्यासाठी गतवर्षीपासून सुमारे ७०  मूक मोर्चे निघाले. रास्ता रोको सारखे जनआंदोलनही समाजाने केले. यानंतरही समाजाच्या मागण्या जैसे थे आहेत. राज्यसरकारने केवळ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नियुक्त केली.  मराठा समाजाला आश्वासन देऊन शासन झुलवत ठेवत आहे, अशी भावना समाजाची झाली आहे.

या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक गुरूवारी सिडकोतील एका मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४ नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमासाठी औरंगाबादेत येत असल्याने   कार्यक्रमस्थळी जाऊन त्यांना समाजाच्या मागण्यांचे काय झाले, याबाबत जाब विचारण्याचा निर्णय झाला. मराठा समाजातील शेकडो लोक,तरूण,तरूणी यावेळी उपस्थित राहतील. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात शासनाचे धोरण स्पष्ट करावे,असा आमचा आग्रह राहणार आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनीही उपस्थित  राहावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार नाहीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आपण त्यांची वेळ घेतली, का असा सवाल केला असता समन्वयक म्हणाले की, आम्ही वेळ घेतली नाही आणि घेणारही नाही. शिवाय मोठ्या संख्येने मराठा समाज मुख्यमंत्र्यासमोर उपस्थित होणार असल्याने आम्ही पोलिसांकडे यासाठी परवानगीही मागणार नाही. मराठा समाज अनेक वर्षापासून शांततेच्या मार्गाने मागण्या मांडत आहे. त्या मागण्यांची पूर्तता करा,एवढीच आमची मागणी आहे आणि ती मागणीही पुन्हा शांततेचा मार्गाने मुख्यमंत्र्यासमोर जाहिरपणे मांडणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही जनतेसमोर त्यांची भूमिका मांडावी, असा आग्रह आहे.