शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

केबीसीच्या कचाट्यात अनेक गावे सापडली

By admin | Updated: July 24, 2014 00:28 IST

इलियास शेख, कळमनुरी शहरासह तालुक्यातील बहुतांश गावात केबीसीने आपले जाळे तयार केले होते. कमी कालावधीत दामदुप्पट रक्कमेच्या आमिषाने अनेक गावे केबीसीच्या कचाट्यात सापडली आहेत.

इलियास शेख, कळमनुरीशहरासह तालुक्यातील बहुतांश गावात केबीसीने आपले जाळे तयार केले होते. कमी कालावधीत दामदुप्पट रक्कमेच्या आमिषाने अनेक गावे केबीसीच्या कचाट्यात सापडली आहेत.मागील चार वर्षांपासून केबीसीने ग्रामीण भागात आपले जाळे निर्माण केले. अडीच वर्षांत १७ हजार २०० रुपयांचे ५१ हजार रुपये देण्याचे आमिष कंपनीने गुंतवणूकदारांना दिले होते. एजंटाचे जाळे तयार केल्याने एजटांनी गावोगाव पिंजून काढून अनेकांना रक्कमा गुंतविण्यास सांगितले. आमिषाला बळी पडून अनेकांनी सोने, जवळील मालमत्ता, शेती विकून केबीसात पैसे गुंतवले. गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने परतावा दिला. त्यामुळे सहजपणे सर्वांचाच विश्वास बसला. लखपती होण्याची भुरळ एजंट गुंतवणूकदारांना घालत होते. एजंटाच्या अलीशान गाड्या, त्यांची स्टाईल यामुळे सर्व सामान्यांना भुरळ पडली. तालुक्यातील एकाने ५० लाख रुपये रोख केबीसीत गुंतवल्याची चर्चा आहे. हा व्यक्ती कोण? याची चौकशी पोलिस करीत आहेत. येथील मुरलीधर गायकवाड यांनी केबीसीत २ लाख ६ हजार ८०० गुंतवले आहेत. तालुक्यात २० ते २५ एजंट असून यात १० कोटीच्याजवळपास गुंतवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. लवकर श्रीमंत होण्याच्या लालसेने एजंटांनी आपले सगेसोयरे, नातेवाईक, मित्र आदींना केबीसीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एजंट जवळचाच असल्याने कोणीही पोलिसांत तक्रार द्यायला तयार होत नाही. येथील पोलिस ठाण्यात एकही तक्रार दाखल झालेली नाही. केबीसीत किती रक्कम गुंतवली? हे सांगण्यास कोणीही तयार नाही. तालुक्यात कळमनुरी शहरासह आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, डोंगरकडा, वाकोडी, खापरखेडा, सालवाडी, मसोड, सालेगाव, रुपूर, नांदापूर, गौळबाजार या गावांसह अनेक गावे केबीसीबाधीत झाली आहेत. सगळीकडे केबीसीचीच चर्चा आहे. कोणी किती रक्कमा गुंतवल्या? याचे रेकॉर्ड नसल्याने काहीही सांगता येणे कठीण आहे. केबीसीच्या गाड्या रस्त्यावर फिरत होत्या. आता त्याही फिरणे बंद झाल्या आहेत. अनेकजण रक्कमा गुंतवून ‘तेरी भी चुप अन् मेरी भी चुप’ या म्हणीप्रमाणे घरी शांत बसले आहेत. एजंट व गुंतवणूकदार किती? तसेच किती रक्कम यात गुंतवल्या गेली? हे सांगणे सध्यातरी सांगणे कठीण आहे.