शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांना गंडवीत होती सोनवतीची टोळी

By admin | Updated: February 21, 2017 22:31 IST

लातूर : सोनवतीच्या टोळीकडून बनावट सोने देऊन अस्सल सोन्याला गंडविल्याच्या घटना आता पुढे आल्या आहेत.

लातूर : लातूर शहरात गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी दरोडे, फसवणूक आणि लुटालुटीच्या घटना घडत आहेत. दुप्पट सोने देण्याचे आमिषाला अनेकजण बळी पडल्याच्या घटना घडल्या असून, सोनवतीच्या टोळीकडून बनावट सोने देऊन अस्सल सोन्याला गंडविल्याच्या घटना आता पुढे आल्या आहेत. सध्या या टोळीतील तिघे पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, चौकशीत या तिघांनीही दुप्पट सोने देऊन फसवणूक केल्याचे कबूल केले आहे. लातूर तालुक्यातील सोनवती गावच्या पाच जणांची ही टोळी गेल्या अनेक दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात अनेकांना गंडवीत होती. वेळप्रसंगी चाकूचा धाक दाखवून लुटतही होती. दरोडा टाकण्याची तयारीही त्यांनी केली होती. यासाठी गुळ मार्केट परिसरातील राष्ट्रीय गुमास्ता मंडळ कार्यालयाच्या शेजारील संरक्षक भिंतीलगत पाच जणांची टोळी दबा धरून बसली होती. या टोळीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सोनवतीच्या टोळीतील परमेश्वर राजेंद्र गायकवाड (२३), नितीन शिवाजी जाधव (२७) आणि पांडुरंग तुकाराम जाधव (२२) या तिघांना अटक केली. उर्वरित दोघे सराईत गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी ठरले. हे तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. आपण लातूर शहरासह जिल्ह्यात केलेल्या गंभीर गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे. विशेष म्हणजे लोखंडाला सोनेरी पॉलिश देऊन ते अस्सल असल्याचे भासवत अनेक महिलांना लुबाडण्याचा या टोळीचा उद्योग आहे. कव्हा नाका परिसरातील एका महिलेलाही गेल्या महिनाभरापूर्वी दुप्पट सोने देण्याचे आमिष दाखवून गंडविल्याची घटना घडली होती. (प्रतिनिधी)