संतोष हिरेमठ, औरंगाबाद केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना सरकारने जीवघेण्या ठिकाणांना (किलर स्पॉट) निश्चित केले पाहिजे. त्या दृष्टीने नकाशा तयार करावा, तातडीने रस्त्यांवरील किलर स्पॉट हटविण्याची मागणी इंटरनॅशनल रोड फेडरेशनने केंद्र सरकारकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांचा बळी घेणार्या औरंगाबाद शहरातील विविध किलर स्पॉटचा घेतलेला हा आढावा. गेल्या काही वर्षांत शहर परिसरातील बीड बायपास, पैठण रोड, नगर नाका ते दौलताबाद टी-पॉइंट, वाळूज रोड, हर्सूल रोड भागात उंच इमारती आणि मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले. या भागांतील रहिवासी आणि शहराबाहेरून ये-जा करणारर्या अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. रस्त्याला लागून विस्तारलेला परिसर, वाहनांची वाढलेली संख्या आणि अरुंद रस्ते, वळणाचे मार्ग, छोटे चौक, अशा अनेक कारणांनी या मार्गांवर किलर स्पॉट तयार झाले आहेत. अशा किलर स्पॉटमुळे या मार्गांवर सुरक्षित वाहतुकीचा वारंवार प्रश्न समोर येत आहे. दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात; परंतु या किलर स्पॉटच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे कोणााचे लक्ष जात नसल्याचे चित्र येते. नोकरी, कामानिमित्त अशा या किलर स्पॉटवरून ये-जा करणारे वाहनचालक आता स्वत: पुरेसी सावधगिरी बाळगण्यावर भर देत आहेत. बीड बायपासवरील दोन्ही बाजूंनी ये-जा करणारे वाहनचालक अनेकदा दुभाजकांत असलेल्या जागेतून वळण घेतात. त्यामुळे मागील वाहनचालकास वाहन नियंत्रणात ठेवणे अवघड होते. दर महिन्याला एक अपघात असे या रस्त्याचे वैशिष्ट््य ठरत आहे.
औरंगाबाद परिसरातही अनेक ‘किलर स्पॉट’
By admin | Updated: June 5, 2014 01:08 IST