वडवणी : माजलगाव येथे मच्छीमारांवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद येथे गुरुवारी उमटले़ हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करत मनसेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ माजलगाव येथे आठ दिवसांपूर्वी गोरगरीब मच्छीमार कुटुंबियांवर ठेकेदाराने गुंडांकरवी हल्ला चढविला होता़ यावेळी गर्भवती महिलेलाही मारहाण केली होती़ त्यानंतर तिचा उपचरारादरम्यान गर्भपातही झाला़ मच्छीमारांना वेठीस धरले जात असून त्यांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव पद्धतशीरपणे आखला जात असल्याचा आरोप मनसे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड यांनी केला़ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करुन मच्छीमारांना त्यांच्या हक्काचा रोजगार पुन्हा उपलब्ध करु न द्यावा, या प्रमुख मागणीसाठी फड यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ आव्हानचे डॉ़ उद्धव नाईकनवरे यांच्यावर दाखल अॅट्रॉसिटीत तथ्य नसून गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली़ श्रीराम बादाडे, यशवंत उजगरे, बाळासाहेब मस्के, भास्कर उजगरे आदी उपस्थित होते़ मोर्चाने शहर दणाणून गेले़ (वार्ताहर)
वडवणी तहसीलवर मनसेचा मोर्चा
By admin | Updated: August 7, 2014 23:34 IST