महापालिकेने मान्सूनपूर्व तयारीअंतर्गत शहरात नालेसफाईची कामे सुमारे ८० टक्के कामे पूर्ण केली आहेत. उर्वरित कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले. महापालिकेने शाखा अभियंता डी.जी. निकम यांच्या नियंत्रणाखाली २४ तास पावसाळी नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हा कक्ष कार्यरत राहणार आहे. नागरिकांनी महापालिकेच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
१३५४ प्रवाशांची तपासणी, तीन बाधित
औरंगाबाद : राज्य शासनाच्या निर्देशानुसार औरंगाबाद शहर अनलॉक करण्यात आले. शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची अजूनही तपासणी सुरू आहे. मंगळवारी १३५४ प्रवाशांची तपासणी केली असता त्यात तीन जण बाधित आढळून आले. रेल्वे स्टेशन, विमानतळावर मंगळवारी १९४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. सोमवारी रेल्वे स्टेशनवर ज्या प्रवाशांची तपासणी केली होती त्यातील दोन जण आज बाधित आढळून आले.
कामगारांना कोरोना प्रतिबंधक साहित्य वाटप
औरंगाबाद : महापालिकेत बचत गटामार्फत साफसफाईचे काम करणाऱ्या ९५ कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याचे वाटप. काम फाउंडेशन व एका कंपनीच्यावतीने साहित्य देण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे, आस्थापना अधिकारी दराडे, बी. जी .पाटील यांच्या हस्ते आज साहित्याचे वाटप करण्यात आले. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात हा कार्यक्रम घेण्यात आला. कामगारांना मास्क, हॅन्ड ग्लोज, हॅड सॅनिटायझर, हॅन्ड वॉश, गम बुट आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. महापालिकेच्या १२५० कर्मचाऱ्यांना लवकरच कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याचे वाटप येणार आहे.