शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या सीईओपदी मनोहरे रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:06 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सोमवारी दुपारी बाबासाहेब मनोहरे रुजू झाले. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मनोहरे यांच्या ...

औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सोमवारी दुपारी बाबासाहेब मनोहरे रुजू झाले.

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मनोहरे यांच्या नियुक्तीला तोंडी स्थगिती दिली होती. मात्र शासनाने मनोहरे यांना दिलेली ऑर्डर मागे घेतली नाही. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्यासोबत मनोहरे यांची भेट निश्चित झाली होती. मात्र ती होऊ शकली नाही. त्यामुळे सायंकाळी मनोहरे यांनी पदभार स्वीकारला. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला तूर्त पूर्णविराम मिळाला आहे.

१८ फेब्रुवारी रोजी मनोहरे रुजू होण्यासाठी औरंगाबादेत आले. मात्र त्यांच्या नियुक्तीला पालकमंत्र्यांनी तोंडी स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. मनोहरे यांनी परस्पर आपण रुजू होत असल्याचे पत्र महापालिका प्रशासक, शासन आणि जिल्हाधिकारी यांना पाठविले. मागील तीन दिवसांपासून सुट्‌या होत्या. सोमवारी मनोहरे पदभार घेण्यासाठी आले. दुपारी चार वाजता प्रशासक त्यांना भेटणार असल्याचे सांगण्यात आले. नंतर त्यांनी तब्येत चांगली नसल्याचा निरोप मनोहरे यांना दिला. या वेगवान घडामोडींनंतर मनोहरे यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आमखास मैदानाच्या बाजूला स्मार्ट सिटीच्या नियोजित इमारतीची पाहणी केली. दरम्यान, या सर्व प्रक्रियेबाबत प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी मनोहरे यांनी सीईओ पदाचा पदभार स्वीकारला आहे.

मागील काही दिवसांपासून स्मार्ट सिटीच्या सीईओ पदाचा जोरदार वाद सुरू होता, त्या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे.